फलटण : तत्कालीन फलटण-खंडाळा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचे अल्पकालीन आजाराने वयाच्या 81 व्यावर्षी सोमवार दि. 19 रोजी रात्री उपचार सुरु असताना निधन झाले. आज मंगळवार दि. 20 रोजी फलटण येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नीलगीरी, लक्ष्मीनगर फलटण या त्यांच्या निवासस्थानी राज्य सहकार परिषद अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, प्रल्हादराव साळुंखे (पाटील), नारायणराव पवार, एस.वाय.खरात, डॉ. विजयराव बोरावके, सुभाषराव शिंदे, बंटीराजे खर्डेकर, शिवरुपराजे खर्डेकर,दिलीपसिंह भोसले, विश्वासराव निंबाळकर, सुभाषराव धुमाळ, विलासराव नलवडे, महेंद्र सुर्यवंशी बेडके, सुदामराव मांढरे, सुरेशबापू पवार, विजयराव घाडगे, वसंतराव बोराटे, हरिष काकडे, नगराध्यक्षा निताताई मिलिंद नेवसे, मिलिंद राजाराम नेवसे, नगरसेवक/नगरसेविका, हंबीरराव भोसले, चंद्रकांत भोसले, काशिनाथ भोसले, अरविंद कदम, डी.के.पवार, धनंजय पवार, महादेवराव चव्हाण, बबनराव निकम, दिलीपसिंह भोसले, राजनभाऊ फराटे, कांताराम भोसले, दत्तोबा भोसले, अच्युतराव खलाटे, बाळासाहेब खलाटे, महादेवराव पवार, सह्याद्री कदम, हनुमंतबुवा नलवडे, तुकाराम नलवडे, बाळासाहेब नलवडे, सुभाषराव धुमाळ, बबनराव भोईटे, रामचंद्रतात्या भोईटे, एस.एम.घाडगे, शिवाजीराव भोईटे, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, वसंतकाका गायकवाड, अॅड. नरसिंह निकम, अॅड. बी.के.शिंदे, अॅड. एन.एम.यादव, नानासाहेब पवार, डॉ. बाळासाहेब शेंडे, अशोकराव पवार, जगुभाऊ नाळे, दादा बुरुंगले, दादासाहेब शेंडे, एन.एम.रणवरे, दत्तोबा गावडे, सतीश रणवरे, सुधीर शहा, बी.के. उर्फ भाऊ निंबाळकर, सुशांत निंबाळकर, डॉ. विष्णुपंत त्रिपुटे, रामविलास रणसिंग, नानासाहेब पवार, यांच्यासह प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, फलटण शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांसह नागरिक स्त्री-पुरुषांनी डॉ. भोईटे यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या सुविद्य पत्नी शशिकला भोईटे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
सन 1962 मध्ये पंचायत राज व्यवस्था निर्माण झाल्यानंतर आरडगाव ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच आणि फलटण पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा बहुमान त्यांना वयाच्या अवघ्या 25 व्यावर्षी आणि त्यानंतर सन 1967 मध्ये फलटण-खंडाळा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सलग 11 वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करण्याची संधी त्यांना लाभली. या 11 वर्षाच्या कालावधीत विधानसभा अंतर्गत विविध समित्यांवर त्यांनी काम केले. या कालावधीतच शेतीला जोडधंदा म्हणून पुढे आलेल्या दूग्ध व्यवसायाची सुरुवात फलटण तालुक्यात करण्यासाठी तत्कालीन नियम निकष बाजूला ठेवून शासनाच्या माध्यमातून पहिल्यांदा फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाची स्थापना त्यांनी केली आणि या संघाच्या माध्यमातून तालुक्यात गाव पातळीवर दूग्ध व्यवसाय विकास सहकारी संस्थांची स्थापना करुन प्रतिदिन दूध संकलन करणार्या दूध संघाची सक्षम यंत्रणा उभी केली. त्यादरम्यान यशवंत को-ऑप.बँक लि., फलटण या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातूनही अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणारी सक्षम यंत्रणा उभी केली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |