04:32pm | Apr 08, 2018 |
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीने तरुणाई त्रस्त असतानाच जिल्हा न्यायालयीन विभागात लघुलेखक, लिपिक, टंकलेखक शिपाई, हमाल, पहारेकरी या पदांची मेगा भरती आयोजित करण्यात आली. त्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल असताना या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याची सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. याबाबत एप्रिल फुल, की सत्य परिस्थिती याचा खुलासा त्वरित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होवू लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर 258, पुणे 643, सांगली 268, सिंधुदुर्ग 72, रत्नागिरी 220, सातारा 300, अहमदनगर 490, ठाणे 447, मुंबई 246, मुंबई लघुवाद न्यायालय 246, मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय 310, बीड 147 अशा लघुलेखक निम्नश्रेणी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल, पहारेकरी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 10 एप्रिल 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. 21 ते 27 एप्रिलपर्यंत प्रवेशपत्र व 6 मे 2018 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी जाहिरात आल्यामुळे राज्यातील सुमारे साडेतीन लाख सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या आशेपायी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके व शिकवण्यांचा आधार घेण्यात येत आहे. असे असतानाच सोशल मिडियावर एका सूचनेद्वारे 6 एप्रिल 2018 रोजी प्रबंधक (तपासणी-1) सुरेंद्र पी. तावडे यांच्या नावे उच्च न्यायालय रिट याचिका क्र. 1137/2018 मध्ये 6/4/2018 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांची रिक्त पदे भरण्याकरीताची मध्यवर्ती ऑनलाईन सेवा प्रवेश प्रक्रिया (सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस) ही तात्काळ स्थगित करण्यात आली आहे, या निर्णयाची संबंधितांनी नोंद घ्यावी अशी सूचना सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे.
मुळातच न्यायालय प्रशासनाच्यावतीने अद्यापही लेखी स्वरुपात सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नक्की वस्तुस्थिती काय आहे? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. याबाबत कोणी एप्रिल फुल केले तर नसावे? अशीही शंका घेतली जात आहे. सध्या अर्ज दाखल केलेले तरुण अभ्यासात मग्न असताना अशा पद्धतीने सोशल मिडियावर व्हायरल होणार्या बाबींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होत आहे. याची जाणीव ठेवून न्यायालय प्रशासनाने याचा त्वरित खुलासा करावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, फिरोज पठाण यांनी व्यक्त केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |