05:53pm | Mar 22, 2019 |
फलटण : वेल्डिंगच्या व्यवसायासाठी सुमारे वर्षभरापूर्वी शेकडा दहा टक्के व्याजाने घेतलेल्या पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात 60 हजार रुपये देवूनही फलटण येथील सोमवार पेठेतील एका अवैध खासगी सावकाराने वेल्डर उमेश प्रमोद आवळे याला बेदम मारहाण करुन जखमी केले आहे. याबाबत संबंधित पीडित फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन देण्यासाठी गेला असता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यास ठाण्यातून पिटाळल्याची घटना फलटण येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की उमेश प्रमोद आवळे (वय 23) रा. सोमवार पेठ, फलटण याचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. वेल्डिंगच्या व्यवसायासाठी उमेश याला भांडवलाची गरज होती. त्यामुळे उमेशने अर्जून सुरेश पवार व अक्षय यल्लप्पा पवार दोघेही रा. सोमवार पेठ, फलटण यांच्याकडून सुमारे एक वर्षापूर्वी शेकडा दहा टक्के व्याजाने 50 हजार रुपये घेतले होते. उमेश आवळे याने वेळोवेळी सुमारे 60 हजार रुपये अर्जून व अक्षय पवार यांना दिलेले होते. मात्र काल दि. 21 रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान सोमवार पेठेतून श्रीराम कारखान्याकडे जाणार्या रस्त्यावर उमेश आवळे व त्याच्या सोबत असणार्या अक्षय लांडगे यांना अडवून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी अर्जून व अक्षय पवार यांनी व्याजाच्या पैशाची मागणी केली. यावेळी उमेश आवळे याने दोघाही पवारांना मी तुमचे सर्व पैसे दिलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पैसे देणे लागत नाही असे सांगितले. त्यावेळी अर्जून व अक्षय पवार यांनी अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिविगाळ करीत उमेश व त्याच्या सोबत असणार्या अक्षयला बेदम मारहाण केली. यानंतर उमेश व अक्षय लांडगे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जावून दोघाही अवैध खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता फलटण शहर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल करुन संबंधित पीडितांना पोलीस ठाण्यातून पिटाळून लावले. दरम्यान, संबंधितांची पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे व गुन्हा दाखल न झाल्यास येथील अधिकारगृहासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |