सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गणपती गुरव (वय 41) रा. सातारा यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केल्याने शिक्षण क्षेत्र हादरुन गेले आहे. सोमवारी सांयकाळी गुरव यांच्याच केबीनमध्ये ही कारवाई झाली असून महिला क्लास वन आफिसर लाच घेताना सापडल्याने यामागे आणखी साखळी असण्याची शक्यताही बळावली आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत पोलिस उपधीक्षक सुहास नाडगौडा यांनी प्राथमिक दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला फरक बिल मंजूर करुन तो काढून घ्यायचा होता. वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून फरक बिल काढण्याच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी तो शिक्षक पुनिता गुरव यांना भेटला. संबंधित कामासाठी मात्र पुनीता गुरव यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. हक्काच्या पैशासाठी लाचेची मागणी झाल्याने त्या शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात (एसीबी) धाव घेतली.
तक्रारदार शिक्षकाने एसीबी विभागात तक्रार दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी तक्रारीची शहानिशा करुन पडताळणी केली. पडताळणीमध्ये लाचेची मागणी झाल्याचे निश्चित झाले. लाचेची संबंधित रक्कम सोमवारी घ्यायची ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला. सांयकाळी महिला शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजाराची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ कारवाई केली.
महिला प्राथमिक शिक्षणाधिकारी एसीबी ट्रॅपमध्ये सापडल्याचे जिल्हा परिषदेत समजताच शिक्षण विभाग हादरुन गेला. लाचलुचपतने प्राथमिक कारवाईची प्रक्रिया केल्यानंतर पुनीता गुरव यांना ताब्यात घेवून विभागात नेण्यात आले. रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली असून मंगळवारी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, या साखळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |