RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डॉल्बीचा तिढा : जिल्हा प्रशासन विरुद्ध खा. उदयनराजे

14 September 2018 at 15:29

आजच्या बैठकीकडे जिल्ह्याच्या नजरा

सातारा : सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव तसा राज्यभरात कधीच चर्चेचा विषय नव्हता. परंतू न्यायालयाच्या आदेशानंतरही खा. श्री. छ. उदयनराजेंनी सातार्‍यात डॉल्बी वाजणारच... असे प्रशासनाविरोधात दंड थोपटल्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या नजरा खा. उदयनराजेंच्या आजच्या बैठकीकडे लागल्या आहेत.
 
डॉल्बी वर उच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. परवा झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी परिक्षेत्रात डॉल्बी वाजणार नाही, दक्षता घ्या अशा सूचना प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षकांनी 1973 च्या क्रिमीनल प्रोसिजरनुसार कलम 144 प्रमाणे परिपत्रक काढले असून डॉल्बी मालक, धारक यांच्याकडे असलेल्या डॉल्बी सिस्टम उत्सव कालावधीमध्ये जप्त करणे तसेच डॉल्बी सिस्टम असलेल्या ठिकाणावरच तहसिलदारांच्या उपस्थितीत ते सील करणे, असे आदेश मिळाल्यानंतर डॉल्बी सिस्टम चालकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी डॉल्बी सिस्टम ताब्यातही घेण्यात आले आहेत. 
 
असे असतानाही हातावर पोट असणार्‍या डॉल्बी सिस्टम चालकांनी खा. उदयनराजेंना साकडे घातले होते. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज दुपारी दीड वाजता होणार्‍या बैठकीकडे प्रशासनासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीमध्येच सातारच्या गणेश विसर्जनाच्या मुद्द्यांसह डॉल्बीचेही भवितव्य ठरणार आहे. जिल्हा प्रशासन विरुद्ध खा. श्री. छ. उदयनराजे असे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसलेली आहे. तसेच लोकभावनेचा आदर म्हणून खा. उदयनराजेही डॉल्बीसंदर्भात आग्रही आहेत. मात्र, सातारा, जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी या बैठकीवर बहिष्कार घालावा, अशा पद्धतीचे मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आ. शिवेंद्रराजेंच्या गटाची कोणतीही मंडळी या गणेश विसर्जनादिवशी डॉल्बी वाजविणार नाहीत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
 
मंडळे झाली जास्त, वाजंत्री झाली व्यस्त...
 
डॉल्बी सिस्टम वाजविण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदीचा फास आवळल्यानंतर अनेक मंडळांनी बेंजो तसेच पारंपारिक वाजंत्री पार्ट्यांकडे बुकिंगसाठी धाव घेतली. मात्र सुमारे वर्षभरापूर्वीच अनेकांच्या तारखा बुक असल्यामुळे अनेक बेंजो, झांजपथक, वाजंत्री पार्ट्यांनी गणेश मंडळांना नकार दिल्यामुळे अनेक मंडळांची गोची झाली आहे. अनेक वाजंत्री व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झाल्यामुळे वाजंत्री पार्ट्यांकडे वादकच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा अनेक गणेश मंडळांना टाळ मृदूंगाच्या गजरात स्वत:च गणेश मिरवणूक काढावी लागणार आहे. मात्र दुसरीकडे पारंपारिक वाजंत्री, झांजपथक, बेंजो यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.


'पिटबुल' चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

येथील गोडोली परिसरातून पिटबुल या अमेरिकन ब्रीडचे साठ हजार रुपये किमतीचे श्वान चोरीला गेले होते .

47 minutes before

स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी

सातारा शहर व परिसरात स्वाईन फ्ल्यूचा विळखा वाढला आहे. महिन्याभराच्या कालावधीत स्वाईन फ्ल्यूचे 10 बळी गेल्यानंतरही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे.

55 minutes before

वाठारकर व सुर्यवंशी यांनी केला २५० कोंटीचा अपहार : याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांचा आरोप

कराड जनता बँकेतील संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बँकिंग क्षेत्रातील कराडची विश्वासहर्ता संपली आहे. बँकेच्या नावात कराड असल्यामुळे अनेक आर्थिक संस्थांमधील आपल्या ठेवी काढून घेऊ लागले आहेत.

1 hour before

गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर सुरुची राडा प्रकरणातील आजी-माजी नगरसेवकांसह १७३ जण हद्दपार

173 संशयितांना गणेशोसत्व होईपर्यंत सातारा तालुक्‍यातून हद्दपार केले आहे.

16 hours before