ठाणे : एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात हे दहाही जण विष कालवणार होते, महाप्रसादात विष टाकून लोकांना मारण्याचा त्यांचा डाव होता. तसंच हे सर्व तरुण झाकीर नाईकपासून प्रभावित होते, असं एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
मुंब्र्यात चारशे वर्ष जुनं मुंब्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद भागवद् कथेचं डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. ही संधी साधून अटक करण्यात आलेल्या तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिकने मंदिरातील महाप्रसादात विष टाकण्याचा प्लान तयार केला होता. मात्र त्या दिवशी मंदिरात ४० हजाराहून अधिक भाविक आल्याने त्यांची योजना फोल ठरल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
अबू हमजा हा या ग्रुपचा मोहोरक्या असून त्याने मुंब्रा बायपास येथे स्फोटाचं प्रात्यक्षिकही केलं होतं. हमजा आणि पोतरिकला या कामात मोहसीन खान उर्फ अबू मोर्या, अताई वारीस अब्दूल रशीद शेख उर्फ मझहर शेख, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, जम्मन खुठेऊपाड उर्फ अबू किताई, सलमान खान उर्फ अबू उबेदा आणि फरहाद अन्सारी यांनी साथ दिल्याचं एटीएसने म्हटलं आहे. यातील दहावा आरोपी अल्पवयीन आहे. हे सर्वजण मुंब्रा आणि औरंगाबादचे रहिवासी आहेत.
झाकीर नाईकपासून प्रेरित
आरोपपत्रानुसार हे दहाही जण झाकीर नाईकपासून प्रेरित होते. या दहाही जणांच्या सोशल मीडियावरून झाकीर नाईकचे फोटो आणि व्हिडिओज जप्त करण्यात आले आहेत. हे दहाही जण मुंब्रा परिसरातील आणखी सहाजणांची माथी भडकावण्याचं काम करत होते. मात्र या सहा तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |