12:46am | Jan 14, 2020 |
सातारा : कण्हेरखेड, ता. कोरेगाव ग्रामस्थांच्यावतीने 14 जानेवारी रोजी कण्हेरखेड व सातारा येथे 259 ‘पानिपत शौर्यदिन’ विविध उपक्रमाने साजरा केला जाणार आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून हजारोंच्या संख्येने तमाम मराठा बांधव व विविध संघटना यात सहभागी व्हावे असे आवाहन कण्हेरखेडचे सरपंच संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले .
तसेच पानिपत रणसंग्रामात सहभागी व प्रसंगी कामी आलेल्या सरदारांच्या वंशजांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.
पानिपत येथे दि. 14 जानेवारी 1761 रोजी अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धास यावर्षी 259 वर्षे पूर्ण होत आहेत.पानिपत युद्धात शिंदे घराण्यांनी थोर पराक्रम गाजवला होता. त्यानंतर लगेचच रणझुंजार महादजी शिंदे यांनी पानिपतचा बदला घेतला व दिल्लीवर मराठाशाहीचा भगवा फडकवला होता. म्हणूनच या वर्षापासून कण्हेरखेड गावी शौर्य समाधी स्थळी पानिपत युद्धातील सेनानींच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरातून सकाळी 8 वा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या जयघोषात रॅलीला प्रारंभ होईल.
पानिपतच्या युद्धात कामी आलेल्यांचा शौर्यशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हाच या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे.पानिपत हरियाणा येथे दरवर्षी महाराष्ट्रातून मराठा बांधव जात असतात. या शौर्य स्मारकास जीवनामध्ये एकदा तरी भेट द्यावी व अशाच पद्धतीने महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावांत 14 जानेवारीस पानिपत शौर्य दिन साजरा व्हावा. पानिपत युद्ध हे राष्ट्र प्रेमाचं प्रतिक आहे. हजारो किलोमिटर दूर जावून शत्रूवर प्रहार करणे सोपी गोष्ट नाही. हे फक्त लढवय्या मराठाच करु शकतो. म्हणून मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास हा नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमाला सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील व आमदार महेश शिंदे हेही उपस्थित राहाणार आहेत.
महाराष्ट्रातील तमाम बांधवानी हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन कण्हेरखेडचे सरपंच संजय शिंदे यांनी केले आहे. यावेळी शेखर शिंदे, महेश पाटील-बेनाडीकरध, रणवीर शिंदे, शेखर शिंदे-पाटील, लहूराज दरेकर, अॅड. विजयसिंह शिंदे. अॅड. जयदिप शिंदे, समीर शिंदे, डॉ. संग्राम शिंदे, सुभाष पवार, केशव शिंदे, संजय मु.शिंदे, अविनाश शिंदे, नारायण शिंदे(सर), विश्वास वा.शिंदे, धनाजी भोसले, संपत मकरे उपस्थित होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |