पुणे : शहरात विविध सोसायट्य़ा, कार्यालयांना सुरक्षा सेवा देणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकांना जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. १८ टक्के जीएसटी कर या रक्षकांच्या सेवेवर लादला जात असल्याने सुरक्षा सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यावर जोर देत आहेत. आतापर्यंत २२ हजारांहून अधिक सुरक्षारक्षकांना कामावरून काढण्यात आले आहे. यामुळे अशा अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकत आहे.
खासगी सुरक्षा एजन्सी विविध व्यक्ती, संस्थांना सुरक्षा सेवा पुरवत असते. हिंदुस्थानात ७० लाखांहून अधिक सुरक्षारक्षक ग्रामीण भागातून कामासाठी आलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरक्षा रक्षक एजन्सीची मोठ्य़ा प्रमाणात आवश्यकता आहे. या कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र आता शासनाने १८ टक्के जीएसटी लावल्याने सुरक्षा एजन्सीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा सपाटा लावला आहे.
याबाबत लोकांना रोजगाराच्या संधी देणाऱ्या या संस्थांना राज्य शासनाने पाठिंबा द्यावा, कर्मचाऱ्यांना वेतन आणि मिळणारे इतर फायदे जीएसटीमुक्त करावे अशी मागणी एजन्सीकडून करण्यात येत आहे. याबरोबरच खासगी सुरक्षा संस्था कायदा २००५नुसार सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून सुरक्षारक्षकांना प्रशिक्षणासह किमान वेतन आणि अन्य लाभ देण्याची मागणीही करण्यात येत आहे. याबाबत जीएसटी कर लावल्याने नोकऱ्या जात असतील तर हे खूप गंभीर आहे. प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे असे सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रमुख गुरूचरण सिंग चौहान यांनी सांगितले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |