02:28pm | Oct 26, 2018 |
कराड : कराड शहरातील चौपदरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारास काळ्या यादीत घाला. जिल्हाधिकार्यांचे आदेश दुर्लक्षित करून ठेकेदारांची पाठराखण करणार्या पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना तात्काळ निलंबित करा. याशिवाय त्रयस्थ समितीमार्फत चौपदरीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
चौपदरीकरणाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत खोटी वक्तव्य करून मुख्याधिकारी यशवंत डांगे नागरिकांची फसवणूक करत भ्रष्ट ठेकेदारांचे पाठराखण करत असल्याचे आरोप करून झाकीर पठाण म्हणाले, स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शाताब्दी निमित्त तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कामांमध्ये कराड शहरातून जाणार्या गुहागर-विजापूर आंतरराज्य मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अकरा कोटी रुपये मंजूर झाले होते. या चौपदरीकरणाच्या कामात दर्जा राखण्यात आला नसल्याचे माध्यमांसह पातळ्यांवर टीका झाली होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जून २०१८ मध्ये लेखी तक्रार केली होती. यात चौकशी समिती नेमून रस्त्याच्या कामाची चौकशी करून याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सादर करण्याचे हा देश कराड पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले होते. या आदेशानंतर चार महिने उलटूनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काहीच केले नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतचे स्मरण पत्र ही पाठवण्यात आले.
याबाबत मुख्याधिकारी मला कसलेच पत्र मिळाले नसल्याचे सांगून कराडकर जनतेची दिशाभूल करत आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवित आहेत. रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करण्यास टाळाटाळ करून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. कराड पालिकेच्या माध्यमातून रस्त्याचे काम झाले असल्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करण्यासाठी आमच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी.
चौकशीचे अधिकार अन्य त्रयस्थ यंत्रणेला देण्यात यावे व तर चौकशी समितीच्या माध्यमातून या कामाची योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली आहे त्याप्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार गडोख यांचे नाव काळे ठेकेदारांचे यादीत घालण्यात यावी. त्यांनी यापूर्वीही संबंधित ठेकेदारांनी अनेक ठिकाणी केलेल्या कामाची परिस्थिती ही अशीच काहीशी आहे. याशिवाय निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराची पाठराखण करणार्या मुख्याधिकारी याला निलंबित करण्यात यावे या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |