सातारा : पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या कारभाराला अनेकजण वैतागले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी तालुक्यातील एका अंगणवाडी पर्यवेक्षिकेला शिवीगाळ करत आपल्या मस्तवालपणाचा कहरच केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.
धुमाळ यांच्या वागणुकीबाबत अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. कार्यालयातील कर्मचारी, तालुक्यातील शिक्षक यांच्यांशी त्यांचे वागणे मुजोरपणाचे असल्याचा आरोप आहे. त्यांना कोणत्याही भाषेत बोलणे, कार्यालयात बोलावून अपमान करणे, वेळप्रसंगी शिवीगाळ करणे, असे उद्योग ते करतात. याबाबत गटविकास अधिकार्यांकडेही तक्रारी दाखल झाल्या आहेत. कुठेही तक्रार करा, माझे मोठे वजन आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी त्यांची सातत्याने भाषा असल्याचे अनेकजणांनी सांगितले.
काहीजणांनी तर त्यांच्याविरोधात थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडेच तक्रारी केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होती. शहरातील एका केंद्रावर धुमाळ यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती होती. याच केंद्रावर एका वर्गात पर्यवेक्षणासाठी एका अंगणवाडी पर्यवेक्षिकेची नेमणूक होती. त्यांच्याकडून पेपर वाटपात किरकोळ चूक झाली व ती त्वरीत लक्षातही आली. ही बाब धुमाळ यांना कळताच. त्यांनी सदर महिलेला, तुमची लायकी नाही, होपलेस अशा शब्दांचा वापर करत भर वर्गात शिवीगाळ केली.
त्यांची किरकोळ चूक असेल तर ते याबाबत लेखी देऊ शकत होते किंवा आयोगाकडे तक्रारही करू शकत होते. परंतु, त्यांच्या अंगातील पदाच्या मस्तीमुळे त्यांनी चक्क शिवीगाळ केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत. दरम्यान, धुमाळ हे सध्या 15 दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे त्यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.
सीईओंच्या कारवाईकडे लक्ष
संजय धुमाळ यांच्या या वागणुकीबाबत अनेक सामाजिक कार्यकत्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. आता डॉ. कैलास शिंदे काय कारवाई करणार याकडे लक्ष
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |