सातारा : नेर ता.खटाव येथील आठवर्षीय बेपत्ता क्रांती शिर्के या बालिकेचा मृतदेह शुक्रवारी विहीरीत आढळून आल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी गावातीलच एका अल्पवयीन मुलासह मृतदेह विहीरीत टाकण्यासाठी मदत करणार्या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी जरी अल्पवयीन असला तरी न्यायालयात होणार्या सुनावणी दरम्यान त्या मुलाची शाररिक वाढ अधिक असल्याचा मुद्दा समोर आणून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संदिप पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संदिप पाटील म्हणाले, शुक्रवारी मृतदेह आढळून आल्यानंतर काही वेळातच आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले व त्यानंतर केलेल्या चौकशीत तो प्रथम अट्टल गुन्हेगाराप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देत होता. मात्र, सखोल चौकशीत त्याने मुलीवर अत्याचार करून व गळा दाबून खून केला व नंतर तो विहीरीत टाकून दिल्याची त्याने कबूली दिली. तसेच मृतदेह विहीरीत टाकण्यासाठी त्याच्या आईने मदत केल्याचेही सांगितले असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून सबळ पुरावे मिळविण्यासाठी मुंबई येथील फॉरेन्सिक तपास पथकाला पाचारण करण्यात आले आहे, असेही संदिप पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नात्यातील मुलाकडूनच कृत्य
दरम्यान, बालिकेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर त्या बालिकेची किडणी काढल्याची अफवा सोशल मिडीयातून पसरविली जात होती. त्याबद्दल बोलताना संदिप पाटील म्हणाले, तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच या गुन्ह्यातील आरोपी हा मुलीच्या नात्यातील आहे. यापुर्वी या मुलाने मुलीची छेड काढण्याचा प्रकार केला होता. तसेच त्याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात मोबाईल शॉपीत चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |