कराड : पाच वर्षाच्या चिमुकलीला कारखाली चिरडून पळून जाणार्या संशयीतास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईक आणि कराडकरांनी मोर्चा काढून कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना निवेदन दिले. दरम्यान, मृत चिमुरडी सई वाडेकर हिच्या नातेवाईकांचे सांत्वन करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिले.
सई वाडेकरचा बुधवारी रक्षा विसर्जन विधी होता. तो झाल्यानंतर सर्व नातेवाईक तसेच शहरातील आणि विशेषत: सोमवार पेठेतील नागरीक मूक मोर्चाने शहर पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी बाहेर येऊन सईच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि शहरातील नागरीकांची भेट घेतली. मुलीला कार खाली चिरडून पळून जात असताना निसर्ग शहा या युवकाला काही लोकांनी अडवले. शहा कुटुंबीय श्रीमंत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याऐवजी कार अडवणार्या लोकांवर शहा कुटुंबीयांनी खोट्या तक्रारी दिल्या आहेत. वास्तविक निसर्ग शहा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी सचिन वाडेकर यांच्या नातेवाईकांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, राजेंद्र माने, शशिकांत हापसे, नगरसेवक विजय वाटेगावकर, विजयसिंह यादव उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी या प्रकरणातील संशयित कार चालक निसर्ग शहावर विविध कलमांसह ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच संशयीतावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला अटक करण्याइतपत प्रकृती सुधारली नसल्याचे डॉक्टरांनी लेखी दिले आहे. त्यामुळे अटक करण्यात तांत्रिक अडथळे येत असून रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करू, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |