02:35pm | Apr 10, 2018 |
सातारा : जिल्ह्यातील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला असणार्या बेंगरुटवाडीजवळ वादग्रस्त असलेल्या एस कॉर्नरवर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या टेंम्पोच्या भीषण अपघातात 18 ठार, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रक्ताचा अक्षरश: सडा पडलेला दिसून येत आहे. या अपघाताची माहिती समजल्यानंतर खंडाळा पोलिसांसह बचावपथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून सुमारे 35 कामगार शिरवळ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला निघाले होते. काल सकाळी हे कामगार तिकोटाहून निघाले होते. मात्र खंडाळ्याचा बोगदा सोडल्यानंतर येथील वादग्रस्त व अपघाती एस कॉर्नरवर आल्यानंतर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो क्र. (केए 37-6037) एस कॉर्नरवर उलटला. या टेम्पोमध्ये 35 पेक्षा जास्त कामगार प्राण्यांप्रमाणे दाटीवाटीने कोंबून बसविण्यात आले होते. गाढ झोपेत असलेल्या कामगारांना काळी समजण्याच्या अगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, जखमींच्या आक्रोशाने बेंगरुटवाडी परिसर हादरुन गेला. महामार्गावरुन जाणार्या-येणार्या प्रवाशांनी पोलिसांना तत्काळ याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी खंडाळा पोलिसांसह रेस्न्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित जखमींना खंडाळा व सातारा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविले आहे. घटनास्थळाचे दृश्य पाहून अनेकांची काळीज हेलावली. यातील जखमींवर उपचार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सपोनि युवराज हांडे, तहसिलदार विवेक जाधव यांनी भेट दिली आहे.
अपघातामधील मृतांची नावे :- माधवी अनिल राठोड (वय 45), शंकर रेकू चव्हाण (वय 55), संतोष काशिनाथ नायक (वय 32), मंगलाबाई चंदू नायक (वय 42), कृष्णा सोनू पवार (वय 60), किरण विठ्ठल राठोड (वय 15), देवाबाई मोहन राठोड (वय 27), संगिता किरण राठोड (वय 26), देवानंद नारायण राठोड (वय 35), तन्वीर किरण राठोड (वय दीड वर्षे), विठ्ठल किरु राठोड (वय 40), अर्जुन रमेश चव्हाण (वय 30), श्रीकांत बासू राठोड (वय 38), सिनू बासू राठोड (वय 30), मेहबूब राजासाब आतार (वय 55), माजिद मेहबूब आतार (वय 25) मृतांमध्ये नागठाणे, मदभाई तांडा, हडगली, राजनाळ, कुडगीतांडा, अलिकारोजा, ता. जि. विजापूर, कर्नाटक या गावांमधील लोकांचा समावेश आहे.
माणसाच्या रक्ताला चटावलेला रिलायन्स इन्फा अजून किती बळी घेणार?
पुण्यापासून सातारा येथील शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रा गेल्या दीड दशकापासून करीत आहे. अतिशय निकृष्ट व सदोष पद्धतीने या रस्त्याचे काम केले आहे. त्यामुळे या महामार्गावर आतापर्यंत हजारोंचे बळी गेले आहेत. असे असतानाही रिलायन्स इन्फ्राकडून जाचक टोल वसुली केली जात आहे, मात्र प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा देण्याकडे मात्र रिलायन्स कानाडोळा करीत आहे. खंडाळा येथील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला असणार्या एस कॉर्नरवर आतापर्यंत शेकडो बळी गेले आहेत. दरवर्षी एक-दोन तरी गंभीर स्वरुपाचे अपघात याठिकाणी होत असतात. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे रिलायन्स आणि जिल्हा प्रशासनाचे आर्थिक लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणार्या काळामध्ये रिलायन्स व जिल्हा प्रशासनाने याबाबत उपाययोजना न केल्यास रिलायन्स व जिल्हा प्रशासनाला ठेचून काढू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |