05:17pm | May 03, 2018 |
सातारा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच त्यानंतर त्या मुलीशी लुटूपुटूचे लग्न करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी संबंधित पीडितेने लैंगिक शोषण झाल्याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेली होती. यानंतर सातारा शहर पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संबंधित पीडिता अल्पवयीन होती. त्याचबरोबर संशयित आरोपीचे पहिले लग्नही झाले होते. त्यावेळी संबंधित पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांना भेटून लव्ह जिहादची तक्रार केली होती. त्यामुळे सातार्यातील सामाजिक वातावरण गढूळ झाले होते. परंतू पोलिसांनी यामध्ये सुवर्णमध्य साधून हा विषय संपवला होता. मात्र यानंतर यातील संशयित आरोपी समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका, सातारा), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहिम व आपटे (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांनी यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीचे खोटे लग्न करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. समीर मुजावर याच्याकडे संबंधित पीडिता शिकवणीसाठी येत होती. यावेळी समीर मुजावर याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याबरोबर खोटेनाटे लग्न करुन त्याचे मोबाईल चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित चौघांनी पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार संबंधित पीडितेने व तिच्या कुटूंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत चौघांवरही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बें्रदे करीत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |