04:17pm | May 12, 2018 |
सातारा : छत्रपती शिवाजीमहाराज शाही घराण्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या राजधानी महोत्सवाच्या पोस्टरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले, यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारत पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल झाल्यास मुख्य पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महोत्सवाच्या सर्व कार्यक्रम आणि तयारीची माहिती घेतली, 25 ते 27 मे दरम्यान आयोजित या महोत्सवाचे आयोजक पंकज चव्हाण यांनी या संपूर्ण संकल्पनेची माहिती त्यांना दिली, बारकाईने सर्व माहिती घेतल्यावर अत्यंत कल्पकपणे या महोत्वाचे आयोजन केल्याची पावती पवारसाहेबांनी दिली, तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी महोत्सवाच्या पोस्टरचे लॉंचिंग त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यापूर्वीच कार्यक्रमाबाबत खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन मा शरद पवार यांना माहिती दिली होती. तसेच कार्यक्रमाला येण्याचे आग्रही निमंत्रण दिले होते, आजही खासदार तसेच आईसाहेब कल्पनाराजे भोसले यांनी पवार यांच्याशी राजधानी महोत्सव तसेच संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली, 25 मे रोजी महोत्वाचे उदघाटन तसेच 27 मे रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची इच्छा पवार यांनी व्यक्त केली, पूर्वनियोजित कार्यक्रमान होणारा बदल तसेच इतर कार्यक्रमातून वेळ काढून महोत्सवास उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, याबाबत अंतिम आणि निश्चित कार्यक्रम त्यांच्या कार्यालयातून अधिकृतपणे कळवण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |