ठाणे : बदलापूर-वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 'महालक्ष्मी एक्स्प्रेस'मधील सर्व १०५० प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफ, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळं हे बचावकार्य अवघ्या तीन ते साडेतीन तासांत पार पडले.
मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळं 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी बाराच्या सुमारास मदतकार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर १४ बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, लष्कर, पोलीस, रेल्वे, स्थानिक प्रशासन या सर्वांचे या बचावकार्यासाठी आभार मानले आहेत.
'महालक्ष्मी एक्स्प्रेस'मध्ये असलेल्या १०५० प्रवाशांमध्ये नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांच्या जेवणाची व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळातच त्यांना बदलापूरला नेले जाणार असून तेथून मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवले जाणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |