RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

माजी आ. शालिनीताई पाटील पुन्हा राजकारणात होणार सक्रीय ; कार्यकर्त्यांची मुंबईत घेतली बैठक

10 August 2018 at 02:00

जरंडेश्‍वरची डिस्टलरी विकून शेतकऱ्यांची बारा कोटीची कर्जे फेडण्याचा निर्णय

कोरेगाव : कोरेगाव-खटाव-सातारा तालुक्यातील दहा ते बारा वर्षापूर्वी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी वाहतूकदार, कामगार, माजी संचालक, शेतकरी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद यांच्या नावे विविध बँकामधून काढलेली किमान दहा ते बारा कोटीची कर्जे फेडण्यासाठी आणि जरंडेश्‍वर सहकारी सभासदांच्या मालकीची असणारी डिस्टलरी विकण्याचा ठराव माजी महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासक किसनराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे माहिम येथील डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना सोसायटीच्या शेतकरी सभासदांच्या बैठकीस सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान या निमित्ताने माजी आ. शालिनीताई पाटील पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची, जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे 27 हजार शेतकरी सभासदांच्या मालकीची असणार्‍या आणि बीओटी तत्वावर लक्ष्मी ऑरगॅनिक प्रा. लि. कंपनी 9 वर्षाच्या भाडेतत्वावर कराराने चालवण्यास देण्यात आलेल्या डिस्टलरीची मुदत 23 फेब्रुवारी 2017 च्या दरम्यान संपुष्टात आली आहे. त्यानंतरही बेकायदेशीररित्या कराराची मुदत 2013 पर्यंत वाढवून संबंधित कंपनीने ऑगस्ट 2018 म्हणजेच आजअखेर जरंडेश्‍वरच्या डिस्टलरीचा ताबा सोडलेला नाही. 

कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे डॉ. शालिनीताईंनी दाद मागितली. साखर आयुक्त कार्यालयाने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीस 2013 पर्यंत दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने साखर आयुक्त कार्यालयाच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. याचा निकाल साधारण तीन महिन्यात लागेल आणि येत्या तीन महिन्यात जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या मालकीची डिस्टलरी पुन्हा एकदा शेतकरी सभासदांच्या मालकिची डिस्टलरी पुन्हा एकदा होणार आहे. या डिस्टलरीची योग्य किमतीत विक्री करून शेतकरी, सभासदांच्या नावावर काढलेले 10 ते 12 कोटीचे कर्ज भरणार असल्याचा निर्धार डॉ. शालिनीताई पाटील यांनी मुंबई येथील बैठकीत व्यक्त केला. 

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकिची असणार्‍या डिस्टलरीची विक्री करून शिल्लक राहिलेल्या कोट्यवधीच्या रकमेतून कोरेगाव तालुक्यात 50 एकर जागा खरेदी करून जरंडेश्‍वर व्यवस्थापनाकडे असलेल्या लायसन्स परवान्याच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यात अडीच हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा दुसरा साखर कारखाना काढण्याचा निर्णय डॉ. शालिनीताई पाटील यांनी मुंबई येथील बैठकीत व्यक्त केला. 

कोरेगाव-खटाव-सातारा या तालुक्यातील शेतकरी, सभासदांच्या नावे दहा ते बारा वर्षे साखर कारखाना चालवण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने विविध बँकांची साधारण 5 ते 6 कोटीची कर्जे काढली होती. 

त्या सर्व कर्जाची नियमानुसार परतफेड करावयाची एकत्रित रक्कम दहा ते 12 कोटीच्या दरम्यान होती. डिस्टलरीच्या विक्रीतून अंदाजे 30 कोटी रकमेची अपेक्षा आहे. त्यामुळे डिस्टलरीच्या विक्रीतून सर्वांच्या कर्जाची परतफेड करायची आणि शिल्लक 18 ते 20 कोटी रकमेतून साखर कारखान्याचे विस्तारीकरण करायचे असा ठराव डॉ. शालिनीताई पाटील यांनी मुंबई येथे घेतलेल्या जरंडेश्‍वरच्या सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

मुंबई येथे झालेल्या बैठकीत जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग सापते, पोपटराव जगदाळे, गुजाबा जाधव, हणमंतराव भोसले, दरे गावचे सरपंच आनंदराव जाधव, प्रशासक किसन घाडगे, शिवसेनेचे नेते दिनेश बर्गे, दीपक केंजळे, बाळू फाळके, प्रकाश फाळके, संचालक मदनेसह किमान 50 शेतकरी, सभासद उपस्थित होते. या सर्वांनी डॉ. शालिनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले. 

चौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील मस्जीदींचे अतिक्रमण हटवा

चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.

5 hours before

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

4 hours before

बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास सक्तमजुरी

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

6 hours before

जमाव व शस्त्रबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खा. उदयनराजे, आ. शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे

सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

6 hours before