मुंबई : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही यायोजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी होता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचेपैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४हजार ९३८ शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आलेआहेत.
महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला होता अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणाउभारून कायमस्वरुपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी करूनघेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
शासनाने मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषिपंपाचीकिंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमीअसल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसीपंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व ५ एचपी डीसीपंपासाठी ३ लाख ८५ हजार होती.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १२हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे. तर ५एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५०एवढी रक्कम भरावी लागत होती ती रक्कम आता अनुक्रमे २४ हजार ७१० व १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी सुमारे ५३३ शेतकऱ्यांनी पैसे भरले असून लवकरच या शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाद्वारे वीजजोडणी देण्यातयेणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar या महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा, असेआवाहन महावितरणने केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |