- प्रकाश राजेघाटगे
बुध : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठया तमाशा मंडळावर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंताना जेवण घालण्याची वेळ आली आहे. शिमग्यापासून महाराष्ट्रातल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. मात्र कोरोनामुळे प्रसिद्ध देवस्थान तसेच गावोगावच्या गर्दीच्या यात्रा रद्द झाल्याने मोठया तमाशा मंडळासह तहान तमाशा मंडळाच्या लाखो रुपयांच्या यात्रांच्या सुपाऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे तमाशा कलावंत हतबल झाला असून शासनाने तमाशा कलावंताना तातडीची मदत करावी, अशी मागणी प्रसिद्ध तमाशा कलावंताकडून केली जात आहे.
ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुर तसंच कला अंगी असणाऱ्या लोकांनी तमाशाच्या माध्यमातून लोककला जपली असून हा वर्ग तमाशाच्या माध्यमातून रोजगार मिळवतो. मार्च ते मे असे तीन महीने तमाशा मंडळात काम करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सावरणारे अनेक लोक तमाशा मधून काम करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गावोगावच्या यांत्रासह प्रमुख देवस्थानांच्या यात्रा रद्द झाल्याने या तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार पाच वर्षापासून आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या तमाशा कलावंताना नोटाबंदी, निवडणूक आचारसंहिता, पूर व आता कोरोनाच्या संकटाने आर्थिक फटका दिला आहे. होळीपासून महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानाच्या गावोगावच्या यात्रा -जत्रांना सुरूवात होते. यात्रांचा खरा हंगाम पाडव्यापासुन सुरू होतो. मात्र याची सुपाऱ्या या अगोदरपासुन घेतल्या जातात. मात्र यंदा कोरोनामुळे घेतलेल्या सुपाऱ्या गावकऱ्यांनी रद्द केल्या. यामुळे तमाशावरच पोट असणाऱ्या या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. तर मोठया तमाशा मालकांचे लाखोचे नुकसान झाले असून आपल्या फडातील शंभर सव्वाशे कलावंताना कर्जाऊ रक्कम घेवून जेवण घालण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट नेमके कधी संपेल, हे अनिश्चित असून सरकारने तमाशा कलावंताना तातडीची मदत करण्याची मागणी तमाशा कलावंत व फड मालकाकडून करण्यात येत आहे.
कोरोनापेक्षा उपासमारीने जीव जायची वेळ, लोककलावंत मंगला बनसोडे यांची खंत
राज्यात कर्फ्यू असल्यामुळे आता आमच्यावर कोरोना व्हायरसने कमी उपासमारीने जीव जायची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली आहे. ऐन उन्हाळ्यात कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर आल्यामुळे आता तमाशा कलावंतांची उपासमार होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावात यात्रा असतात. या काळात गावात येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी तमाशाचे आयोजन केलं जातं. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने यात्रा रद्द केल्या आहेत. त्याचा परिणाम अनेक तमाशांचे फड आपल्या मूळ गावी किंवा चौफुला गावात अडकून पडलेत. आता त्यांच्याकडे जवळ असणारी पुंजी संपायला आल्यामुळे आता या कलाकारांवर उपासमार होण्याची वेळ आली आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि कलावंतांना काहीतरी मदत करावी अशी मागणी मंगला बनसोडे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणाले की, राज्यातील जेवढे तमाशांचे फड मालक आहेत. त्यांच्याकडे 100 ते 125 लोक काम करत असतात. सध्याच्या परिस्थितीत काम बंद झाल्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती आणखी किती दिवस राहिल याबाबत अद्याप तरी काही सांगता येतं नाही. आम्हांला राज्यातील अनेक गावातून तमाशाच्या तारखा मिळाल्या होत्या. त्याच्या आशेवर आम्ही काही रक्कम कलाकारांना दिली होती. परंतु आता तमाशेच रद्द झाल्यामुळे राहिलेले पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे कलाकारांना काहीच पैसे देता येणार नाहीत. जर अशीच परिस्थिती राहिली तर कलावंताचं जगणं मुश्किल होईल. सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि निदान या कलाकारांपर्यंत किराणा माल तरी पोहचावा याची व्यवस्था करावी.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |