06:29pm | Jan 21, 2019 |
सातारा (संग्राम निकाळजे ): राज्याच्या पश्चिम घाटामध्ये वसलेले महाबळेश्वर आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जगात प्रसिद्धी पावलेले आहे. कोकणातून घाटमाथ्यावर येण्यासाठी व घाटावरुन महाबळेश्वरला जाण्यासाठीही घाटच. त्यामुळे महाबळेश्वर आणि परिसरात अपघात नित्याचेच झाले आहेत. जिथे सरकारी यंत्रणा कुचकामी ठरते, त्यावर आता महाबळेश्वर ट्रेकर्स रामबाण इलाज ठरत आहे, हे गेल्या काही वर्षांपासून सिद्ध होवू लागले आहे. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक आपला जीव धोक्यात घालून लोकांना जीवनदान देत आहेत. चला तर घेऊयात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या चढाईचा आढावा.
सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगांमध्ये महाबळेश्वर-पाचगणी ही गिरीस्थाने विसावलेली आहेत. सर जॉन माल्कम या ब्रिटीश अधिकार्याने हे गिरीस्थान शोधून काढले, त्याचा विकास केला. ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी महाबळेश्वरच असायची. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व दक्षिण भारताचे नागर जीवन जिच्यावर अवलंबून आहे, त्या कृष्णा, कोयना नदीचे उगमस्थान म्हणजे महाबळेश्वर. प्राचीन मंदिरे आणि थंड हवेमुळे गेल्या अनेक शतकांपासून महाबळेश्वर टुरिस्ट डेस्टिनेशन झालेले आहे. परंतू या गिरीस्थानावर येण्यासाठी बिकट वाट पादाक्रांत केल्याशिवाय या गिरीस्थानाचे सौंदर्य अनुभवताच येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच या सह्याद्रीच्या घाटांमध्ये अपघात नित्याचेच झाले आहेत. परंतू अपघात झाल्यानंतर हातात असेल ते काम सोडून अपघातग्रस्तांचे जीव वाचविणारे साक्षात देवदूतांचीच अनुभूती देणारे म्हणून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.
गेल्या आठवड्यात मेढा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिकणार्या एका विद्यार्थ्याने वेण्णा नदीत उडी मारुन आत्महत्त्या केली होती. सुमारे चार दिवस त्या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) प्रयत्न करीत होते. मात्र मृतदेहाचा शोध घेवूनही तो मिळत नसल्यामुळे देशातील सर्वात मोठे शोध पथक असलेल्या एनडीआरएफनेसुद्धा गुडघे टेकले व ते पुण्याकडे मार्गस्थ झाले. मात्र, महाबळेश्वर ट्रेकर्सने आपला लढावू बाणा सोडला नाही. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ हा दत्ताजी शिंदेंचा सातारी बाणा ठायी असणार्या महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी एनडीआरएफच्या हाराकीरीनंतरही आपली शोध मोहीम चालूच ठेवली. चौथ्या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या अथक प्रयत्नानंतर त्या बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. तीन दिवस पोटात अन्नाचा कणही नसणार्या त्या मृत विद्यार्थ्याच्या पालकांना महाबळेश्वर ट्रेकर्सच्या प्रयत्नांमुळेच आपल्या पोटच्या गोळ्याचे अंतिम दर्शन घेता आले. नदी किनारीच उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यावर महाबळेश्वर ट्रेकर्सने व कुटूंबियांनी अंत्यसंस्कार केले. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या दातृत्वापुढे त्या विद्यार्थ्याचे पालकही नतमस्तक झाले.
2002 पासून या संस्थेचे काम सुरु आहे. 2012 साली महाबळेश्वर ट्रेकर्सची स्थापना करण्यात आली. सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सने विविध अपघाती घटनांमध्ये सुमारे दीडशे मृतदेह खोल दरीतून व पाण्यातून शोधून काढले. तसेच 50 ते 60 अपघातग्रस्तांना जीवनदान देण्याचे कामही महाबळेश्वर ट्रेकर्सने केलेले आहे. महाबळेश्वर परिसरातील खोल दर्यांमध्ये अनेकजण आत्महत्त्या करतात. काही दिवसांनंतर याबाबत पोलिसांना समजल्यानंतर पोलीसही महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करतात. 8-10 दिवसानंतर मृतदेहाची दशा वाईट झालेली असते. त्याला असह्य अशी दुर्गंधी सुटलेली असते. असे असतानाही हजारो फूट खोल दरीत उतरुन महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक असे मृतदेह आपल्या अंगाखांद्यावर घेवून दरीतून वर येत असतात. जिथे नातलगही मृतदेहास हात लावण्यास कचरतात. अशा मृतदेहांना आपल्या अंगाखांद्यावर हे महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक कसे दरीतून वर घेवून येतात, हे खरेतर अनाकलनीय आहे. 2015 साली आंबेनळी घाटात एका कुटूंबाचा कार अपघात झाला होता. पोलादपूर मार्गे महाबळेश्वर येथे दक्षिण भारतातील एक कुटूंब येत होते. दिवसासुद्धा आंबेनळी या अक्राळविक्राळ घाटाचा गाडीचालकाला अंदाज येत नाही. अशाच एका रात्री वळणावर घाटरस्त्याचा अंदाज न आल्याने त्या दक्षिण भारतीय कुटूंबाची कार खोल दरीत कोसळली होती. गंभीर जखमी झालेल्या ते कुटूंब तब्बल 52 तास त्या दरीमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकले होते. सुदैवाने मोबाईल नेटवर्क मिळाल्यामुळे स्थानिक पोलीस तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सना मिळाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सने याठिकाणी शोधमोहीम हाती घेत या कुटूंबातील चारही जणांना तब्बल 52 तासानंतर जिवंत बाहेर काढण्याची किमया केली होती. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सचे नाव संपूर्ण देशात झालेले होते. त्या अपघातग्रस्त चौघांनाही महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक साक्षात देवदूतच असल्याची अनुभूती आली होती. गेल्यावर्षी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांची सहल महाबळेश्वर येथे येत असताना वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची बस आंबेनळी घाटातील खोल दरीत कोसळली होती. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. हे तीसही मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी बाहेर काढण्याचे काम केले होते. आपला जीव धोक्यात घालून महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक हजारो फूट खोल दरीत उतरुन मृतदेह तसेच जखमी व्यक्ती बाहेर काढीत असतात. कोणतीही आधुनिक साधने नसताना पारंपारिक साधनांचा वापर करुन महाबळेश्वर ट्रेकर्स आपले काम चोख बजावित असतात. महाबळेश्वर ट्रेकर्सकडे स्वमालकीची रुग्णवाहिका, बोट, फिश लोकेटर आदी साधने उपलब्ध आहेत. आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी अजून सुमारे दहा लाखांची आवश्यकता आहे. तसेच खोल पाण्यात शोध घेण्यासाठी मोटरबोटीची आवश्यकता आहे. असे असतानाही स्थानिक प्रशासन रात्री-अपरात्री दुर्घटना झाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सला पाचारण करते. महाबळेश्वर ट्रेकर्सचे अर्ध्वयू सुनिल भाटीया तसेच अनिल केळघणे, निलेश बावळेकर, पत्रकार राहुल तपासे, ओमकार नाविलकर, बाबू वागदरे, जयवंत बिरामणे, दिनेश झाडे, सुनील वाडकर हे आपल्या टीमसह अपघात ठिकाणी हजर असतात. हे सर्व व्यवसायिक तसेच नोकरदार आहेत. त्यांनाही परिवार आहे. असे असतानाही महाबळेश्वर ट्रेकर्सचे स्वयंसेवक जिवावर उदार होवून महाबळेश्वर तसेच सातारा जिल्ह्यासह इतर ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करीत असतात.
या उलट राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) कडे बचावकार्यासाठी आधुनिक साधने आहेत. बीएसएफ, सीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी या निमलष्करी दलातील जवानांना प्रशिक्षण देवून गृह विभागाने 2005 साली एनडीआरएफची स्थापना केली. महाराष्ट्रातील पुण्यासह देशभरात एनडीआरएफचे 12 विभाग आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती वा अपघात झाल्यास एनडीआरएफला पाचारण केले जाते. उपलब्ध हायटेक साधने व प्रशिक्षण दिल्यामुळे एनडीआरएफचे जवान कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतात. निमलष्करी दलात कार्यरत असणार्या या जवानांना गलेलठ्ठ पगारही असतो. त्या उलट, महाबळेश्वर ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांची उलट परिस्थिती आहे. कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक साधने जवळ नसतानाही 2002 पासून महाबळेश्वर ट्रेकर्स आपले काम चोख बजावित आहे. 2012 साली महाबळेश्वर ट्रेकर्सने धर्मादाय संस्थेकडे आपली नोंदणी केली आहे. शेकडो लोकांचे मृतदेह आप्तांना खोल दरीतून बाहेर काढून देणार्या तसेच अनेकांना नि:स्वार्थपणे जिवनदान देणार्या महाबळेश्वर ट्रेकर्सला अत्याधुनिक साधने, स्वयंसेवकांचे विमे, तसेच इतर मदतीची गरज आहे. समाज धुरिणांनी तसेच शासनाने या स्वयंसेवकांच्या मदतीसाठी आता पुढे यायला हवे, तरच भविष्यामध्ये हे स्वयंसेवक कोणतीही अनुचित घटना व दुर्घटनेत अधिक सक्षमपणे सामोरे जातील.
महाबळेश्वर ट्रेकर्सला आर्थिक मदत करण्यासाठी खाली दिलेल्या बँक खात्यावर आपण आर्थिक स्वरुपात मदत करु शकता.
महाबळेश्वर ऍडव्हेंचर ट्रेकर्स असोसिएशन- युनियन बँक ऑफ इंडिया, महाबळेश्वर शाखा.
खाते क्रमांक : 438302010085322
आयएफएससी कोड : (UBIN0543837
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |