03:33pm | Sep 23, 2019 |
सातारा : तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांच्या लेखी विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजेंची विश्वासार्हता संपुष्टात आली. सत्तेत नसतानाही मिस्टर रामराजेंना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसवून शरद पवार ही काय चीज आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. परंतू ज्या रामराजेंसाठी शरद पवारांनी वेळोवेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, त्याच रामराजेंनी अडचणीच्या काळात पवारांचा हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतू भाजप-शिवसेनेच्या वळचणीला जावूनही डाळ शिजली नसल्याने मिस्टर रामराजेंची अवस्था आता ना घर का, ना घाट का अशी झाली आहे.
2009 साली फलटण विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी जागा राखीव झाल्यानंतर फलटण तालुक्यातील राजकीय गणिते बिघडली. ऐनवेळी बसलेल्या झटक्यामुळे मिस्टर रामराजेंचे राजकारण संपते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतू जी परिस्थिती माणमध्ये होती, तीच परिस्थिती फलटणमध्ये आहे. ऐनवेळी लंगड्या घोड्याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात आला. त्याच्या गळ्यात आमदारकीचा पट्टा बांधला. गेली दहा वर्षे या घोड्यावर बसून मिस्टर रामराजे जिल्ह्याचे राजकारण करीत आहेत. गेल्या 19 वर्षाच्या राजकारणात शरद पवारांनी मिस्टर रामराजेंसह त्यांच्या दोघाही बंधूंना भरभरुन दिले. प्रसंगी विरोधकांशी दोन हातही केले. रामराजेंसाठी स्वकियांचे राजकारणही संपवले. परंतू 2014 साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडीचे पानिपत झाले. या पानिपतानंतरही पवारांनी मिस्टर रामराजेंवर विश्वास दाखवून कॉंग्रेसचे विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणून 20 मार्च 2015 रोजी मिस्टर रामराजेंना विधान परिषदेच्या गादीवर बसवले. यानंतरच्या गमजा संपूर्ण जिल्ह्याने पाहिल्या आहेत. उदयनराजेंना दुखावणे, राष्ट्रवादी अंतर्गत दुफळी माजवणे, फोडा-फोडीचे राजकारण करणे हे गेल्या चार वर्षातील राजकारणामुळे मिस्टर रामराजेंनी जिल्ह्यात उच्छाद मांडला. परिणामी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कमकुवत झाली. शरद पवारांनाही राज्याच्या राजकारणातून सातार्याच्या राजकारणात लक्ष द्यायला उसंत मिळाली नाही. तोपर्यंत मिस्टर रामराजेंनी सातारच्या राजकारणाची दुर्दशा करुन टाकली होती. शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप निर्माण झाला. परंतू याच्या कैक महिने अगोदर मिस्टर रामराजेंनी भाजपसह शिवसेनेकडे जॅक लावला होता. परंतू पडद्यामागील हालचालींकडे शरद पवारांचे बारीक लक्ष होते. माढा लोकसभा मतदारसंघात यावेळी वेगवान हालचाली घडल्या. खिजगणतीत नसणार्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मिस्टर रामराजेंचे गणित कोलमडले. आता पुढे काय? राष्ट्रवादीतच रहायचे, की रणजितचे काम करायचे? या पेचात मिस्टर रामराजेंचा भुकटा पडला. परंतू काही झाले तरी रणजित पडला पाहिजे, या एकाच आसुरी ध्येयाने मिस्टर रामराजे पछाडले होते. परंतू माढा मतदारसंघात जय-विरुची जादू चालली. मोठ्या मताधिक्याने रणजितसिंह निवडून आले. ज्यांना सतत पाण्यात बघितले, अशी मंडळी खासदार झाल्यामुळे मिस्टर रामराजेंची अस्वस्थता वाढली. काहीही करुन सभापतीपद वाचवले पाहिजे, यासाठी मातोश्री सह वर्षा वरही खेटे वाढले. परंतू शरद पवारांसह जय-विरु ने मारलेल्या खुट्टीमुळे मिस्टर रामराजेंची डाळ कुठेच शिजली नाही.
विधान परिषदेचे उप सभापतीपद शिवसेनेकडे आहे, तर भाजपमधील अनेक ज्येष्ठ मंडळी विधान परिषदेच्या सभापतीपदाकडे असल्याने भाजपनेही मिस्टर रामराजेंना हिंग लावून विचारले नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात मिस्टर रामराजेंसह त्यांच्या दोघाही दाढीवाल्या बंधूंनी मेळावा घेवून आपली ताकद फलटणमध्ये आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतू या मेळाव्यातही धत्तुरा मिळाल्यामुळे आता जायचे कुठे? शेवटी पवार जिंदाबाद म्हणत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. इकडे दिगंबर आगवणेंसह रणजितसिंहांनीही तालुक्यात सत्तांतर करण्याचा चंग बांधला आहे. त्यातच खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तालुक्याच्या पाणी प्रश्नासह रेल्वेचाही प्रश्न मार्गी लावला आहे. सध्या तालुक्यात खा. रणजितसिंहांची हवा आहे. मिस्टर रामराजेंची फलटण तालुक्यावरील मांड आता ढिली होवू लागली आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक फलटण तालुक्याच चुरशीची होणार आहे. 24 वर्षानंतर फलटण तालुक्यात सत्तांतर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल सातार्यात झालेल्या संघर्ष यात्रेत खा. शरद पवारांनी अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन केले. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविना आम्ही सातार्यात गर्दी जमवू शकतो, हे राष्ट्रवादीने दाखवून दिले. तत्पूर्वी काल माळेगावातील गोविंदबागेतून शरद पवार फलटणमार्गे सातार्याकडे येत असताना फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांनी पवारांचे फलटण शहरात जोरदार स्वागत केले. ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, पूर्व भागातील नेते शिवरुपराजे खर्डेकर व माळी समाजातील नेते दशरथ फुले यांनी फलटण तालुका अजून पवारांबरोबरच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतू फलटणच्या राजांना पवारांनी हिंग लावून विचारले नाही. पवार सातार्यात पोहोचल्यानंतर मिस्टर रामराजेंनी त्यांच्या आमदारांसह संजीवराजेंना संघर्ष मेळाव्याला पाठवून दिले. येवू नको तर कुठल्या गाडीत बसू? अशी अवस्था सध्या मिस्टर रामराजेंची झालेली आहे. भाजप-सेनेकडे धडका देवूनही त्यांनी विचारले नसल्याने आता राष्ट्रवादीतच राहू, अशी भूमिका मिस्टर रामराजेंनी घेतलेली आहे. मात्र मिस्टर रामराजेंच्या भाजप-सेनेच्या दारात जावून आलेल्याची खबर पवारांना असल्यामुळे पवारही आता मिस्टर रामराजेंंना हिंग लावून विचारत नाहीत. मिस्टर रामराजेंना पर्याय म्हणून पवारांनी फलटण तालुक्यात चाचपणी सुरु केली आहे. फलटणच्या पूर्व भागात राष्ट्रवादीची हवा आहे. निंबळकचा राम ही पवारांच्या आदेशासाठी आसुसलेला आहे. त्यामुळे मिस्टर रामराजेंविना तालुक्यातील राष्ट्रवादीजन लढण्यास तयार आहेत. त्यामुळे सगळीकडे धडका देवून आलेल्या मिस्टर रामराजेंची राष्ट्रवादीसोबत राहणे ही परिहार्यता नव्हे तर अपरिहार्यता झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |