06:26pm | Sep 22, 2018 |
सातारा : राष्ट्रवादी सुप्रिमो तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आज सातारा दौर्यावर आहेत. सातारा शासकीय विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याला खिंडार पाडण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी खिंडार पाडण्याचा उद्योग कधीपासून सुरु केला, असा सवाल करीत चंद्रकांतदादांची खिल्ली उडवली.
सातारा शासकीय विश्रामगृहावर खा. उदयनराजे विरुद्ध संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी या हाय व्हॉल्टेज ड्राम्यानंतर खा. शरद पवारांची विश्रामगृहावरच छोटेखानी पत्रकार परिषद झाली. यामध्ये पत्रकारांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याला खिंडार पाडण्याचे वक्तव्य केले होते. तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवावी असे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना खा. शरद पवार म्हणाले, ते ज्या राष्ट्रीय पक्षाचे मंत्री आहेत, त्या पक्षाने आजपर्यंत स्वतंत्रपणे निवडणूक कधी लढवली आहे काय? कधी शिवसेनेबरोबर, कधी आठवलेंच्या रिपाईबरोबर घरोबा करत निवडणुका लढवल्या. आपलं झाकून ठेवायचं आणि दुसर्याचं बघत रहायचं, हाच उद्योग भाजपमधील पुढारी करीत असतात. चंद्रकांत पाटीलही त्याला अपवाद नाहीत. त्यांनी केलेले खिंडार पाडण्याचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यामुळे त्यांनी खिंडार पाडण्याचा नवीन उद्योग कधीपासून सुरु केला? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे नको त्या गोष्टीबाबत त्यांनी नको ते वक्तव्य करु नयेत, असे म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले.
भाजपने फार मोठे देशहिताचे काम केले असते तर समजू शकतो. मात्र तसे काहीच नाही. खा. उदयनराजे यांच्या सकाळच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी खा. उदयनराजेंबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत. ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत. त्यामुळे या विषयावर बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीबाबत बगल देत त्यासंदर्भात ना श्रीनिवास पाटलांशी चर्चा झाली, ना स्थानिक आमदारांची. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा, तो पक्षीय पातळीवर घेतला जाईल. भाकरी तव्यापर्यंत आलीच नाही त्यामुळे करपायचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी हलकीफुलकी बॅटिंग खा. पवार यांनी आज सातार्यात केली. मात्र, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वल्गणेचा खा. पवारांनी चांगलाच समाचार घेतला. याची चर्चा मात्र सातारच्या राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चिली जात होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |