लोणंद : लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव गावचे हद्दीत जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार तर, ६ जण जखमी झाले आहेत. महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (वय 4 , दोघे रा. बल्लाळवाडी) आणि सृष्टी संतोष साळुंखे (वय 9 रा. दावलेवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वावरहिरे (ता.माण) येथून मुंबईला निघालेली जीप रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात पडली. या अपघातात चालकासह दोघे जण जागीच ठार झाले.
माण तालुक्यातील वावरहिरे येथील साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय भाग्यश्री टुर्स अॅन्ड ट्रॅव्हर्लसच्या जीप (क्र. MH 42 AQ 574) मधुन मुंबईला निघाले होते. त्यांनी लोणंदच्या पुढे एका ढाब्यावर जेवण केले, यावेळी चालक महेश बल्लाळ हा दारु पिला. पाडेगाव जवळील कॅनॉलच्या वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप कॅनालध्ये गेली. पाण्याच्या वेगाने जीप पाण्यातच एका बाजुला उभी राहीली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंर कॅनॉल जवळील पाडेगाव येथील नवले कुंटुबातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान एका आरोपीच्या शोधात असलेले लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ निखिल नवले, रोहीत नवले, कॉ. अविनाश शिंदे, कॉ. रोहीत गायकवाड यांनी पाण्यात उडया मारून जीप मध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले आणि त्यांना लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |