सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. जागोजागी ऊसाच्या रसाच्या गाड्या या आवर्जून दिसू लागल्या आहेत. त्यांच्या भोवती गर्दी होऊ लागलेली आहे. ऊसाचा रस हा उन्हाळ्यामध्ये पिण्यास चांगलाच असतो. पण या दिवसामध्ये ऊसाच्या रसामुळे बाधा झाल्याने अनेक रुग्णही रुग्णालयात येतात. याचा अर्थ असा नाही कि ऊसाचा रस पिऊ नये, पण ऊसाचा रस उन्हाळ्यात पितांना काही साध्या गोष्टी जरूर कराव्यात.
१) शक्यतो आपल्याकडे असलेल्या स्वच्छ पाण्याचे बाटलीने ऊसाचा रस काढण्याआधी ऊसाचे मशीन धुवून घ्यावे.
२) ऊसाच्या रसामुळे जास्त बाधा ही, रसामुळे नव्हे तर त्यासाठी वापरला जाणारा बर्फ असतो त्यामुळे होते. कारण हा बर्फ बऱ्याचदा दुषित पाण्यातून बनवलेला व ऊसाच्या रसाच्या गाडीवाल्यांनी कुठून तरी विकत आणलेला निकृष्ट बर्फ असतो. त्यामुळे शक्यतो ऊसाचा रस घेतांना हा बर्फ न टाकता रस घ्यावा किंवा घरचा स्वतः च्या फ्रीज मधला, फ्रेश बर्फ वापरावा.
३) शक्य झाल्यास आपल्या स्वतःच्या भांड्यामध्येच ऊसाचा रस काढून आणावा. ऊसाच्या रसवंती वर किवा गाड्यावर बनवून ठेवलेला रस कधीही घेऊ नये. कारण, या रसामध्ये अर्ध्या तासाच्या वर ठेवलयास जंतू निर्माण झालेले असतात. त्यामुळे रस घेतांना फ्रेश रस काढून देण्याचा आग्रह धरावा. ऊसाच्या रसवंतीवाल्याची रस गाळण्याची गाळणी पण जंतुसंसर्गाचे कारण असू शकते. म्हणून ही गाळणी स्वतःची वापरावी किंवा अतिस्वच्छ धुवून घ्यावी.
४) ऊसाच्या रसामध्ये पाणी न टाकता तो रस घ्यावा घरी आणल्यावरही ऊसाचा रस फ्रेश प्यावा किंवा फ्रीज मध्ये ठेवावा.
५) ऊसाचा रस काढून घेतांना ऊस तपासून घ्यावा हा ऊस जर पिवळा हिरवा असेल तर तो चांगला असतो, लाल, काळा किंवा किडलेला असेल तर तो चांगला नसतो त्यामुळे बाधा होऊ शकते.
६) ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतांना या गोष्टी पाळल्या तर तुम्हा कोणालाच आम्हा डॉक्टरांकडे येण्याची गरज पडणार नाही.
- डॉ. अमोल अन्नदाते
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |