08:01pm | Jul 23, 2018 |
सातारा : सातारा बाजूकडून निरेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकाला वाठार स्टे. लोणंद रोडवर असणाऱ्या रंगीला राजस्थान या धाब्यालागत अडवून हाताने व दगडाने गंभीर मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व एकवीस हजार दोनशे रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी वाठार स्टे. पोलिसांनी फलटण- खटाव व कोरेगाव येथील चौघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरीफ इस्राईल खान (वय ३९) रा.नुहूमेवात, हरियाणा हे दिनांक २० जूलै रोजी सकाळी सव्वा पाच वाजता वाठार स्टे. पोलीस हद्दीतील लोणंद-वाठार स्टे. रोडवरील रंगीला राजस्थान येथे ट्रक क्र. एच-आर ५५ एस ३९९४ थांबवून प्रात:विधीसाठी गेले होते. नेमके याचवेळी त्याठिकाणी तीन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी ट्रक चालक शरीफ खान यांना हाताने व दगडाने गंभीर मारहाण केली. व त्यांच्या जवळील एक मोबाइल व रोख रक्कम रु २१,२०० रुपये घेऊन पोबारा केला. घडलेल्या घटनेची तक्रार संबंधीत ट्रक चालकाने वाठार स्टे. पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वाठार स्टे. पोलिसांनी दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार सोपान हिरालाल सरक, (वय २३) रा. मिरगाव, ता फलटण, अमोल नामदेव सोनवलकर, (वय २४) रा. मिरगाव, ता. फलटण, संतोष संजय बुधावले, (वय.२१) रा. रामोशिवाडी ता कोरेगाव व रोहित शंकर जाधव (वय. २१) रा. चिंचणी ता. खटाव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तसेच यापूर्वी या टोळीने वाठार स्टे. आणि लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वाहन चालकांना लुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार तपास सुरू आहे. या कारवाई मध्ये वाठार स्टे. पोलीस ठाण्याचे सपोनि. मारुती खेडेकर, सहा.पो फौ. सूर्यकांत जाधव, पो.ह. मोहन भोसले, पो ना अतुल कुंभार, अजय झुंजार, सचिन जगताप, राहुल मोरे यांनी गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाई बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत अधिक तपास सपोनि. मारुती खेडेकर करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |