नवी दिल्ली : दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.
२४ शॉटच्या अंतिम लढतीत मनूने २३७.५ गुणांची कमाई केली. जावालाने २३७.१ गुण मिळविले. फ्रान्सची सेव्हिले गोबरविले हिने कांस्य पदक मिळविले.
अकरावीला शिकणाºया मनूने अलीकडेच २०१८ च्या ब्यूनस आयर्स युवा आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. आता सुवर्ण जिंकून तिने सत्रातील पहिल्या विश्वचषकात देशासाठी शानदार कामगिरी केली आहे.
याआधी रवी कुमार याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून विश्वचषकात स्वत:च्या पदकाचे खाते उघडले. रवीने मागच्यावर्षी तीन फायनलमध्ये स्थान मिळविले होते. पण पदक मात्र मिळाले नव्हते. त्याने २२६.४ गुणांची कमाई केली.
तिसºया आणि चौथ्या स्थानाच्या चढाओढीत रवीने आपलाच सहकारी दीपक कुमारला शूटआऊटमध्ये मागे टाकले. त्याचवेळी हंगेरीचा प्रतिभावान युवा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इस्तवान पेनी याने २४९.५ गुणांसह सुवर्ण तसेच आॅस्ट्रियाचा अलेक्झांडर शिर्मिल याने २४८.७ गुणांसह रौप्यची कमाई केली.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शाहजर रिझवी आणि जीतू राय यांनी पुरुषांच्या दहा मीटर पिस्तुल प्रकारात क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकले होते. मेहुली घोष हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |