फलटण : बरड, ता. फलटण येथे पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह तीनजण जागीच ठार झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूरहून पुणेच्या दिशेने चाललेली असेंट कार क्र. एमएच 14 बीसी-9480 ही चारचाकी आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून ती कार रस्त्यालगत असणार्या झाडाला जोरदार धडकली. या गाडीमध्ये सुमारे 9 प्रवासी प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. या अपघातामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी, 7 ते 8 वर्षे वयाचा मुलगा व चालक असणारा 23 वर्षाचा युवक जागीच ठार झाले आहेत. (मृतांची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही) तर गाडीतील इतर सहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पाचजणांची बसण्याची क्षमता असलेल्या या गाडीमध्ये सुमारे नऊजण दाटीवाटीने बसविले असल्यामुळे हा अपघात झाला असण्याबाबतची शक्यता नाकारता येत नाही. अपघातस्थळी रक्ताचा अक्षरश: सडा पडलेला होता. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |