11:57pm | Mar 07, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकार्यांच्या बदल्या झाल्याबाबतचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी रद्द केल्याने शहर पोलिस ठाण्याचे कारभारी पोनि नारायण सारंगकर हे जैसे थेच राहणार आहेत. दरम्यान, बुधवारी दिवसभर त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच सांयकाळी अखेर बदली आदेश मागे घेतल्याचे समोर आले.
शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांनी एक वर्षापूर्वी कार्यभार हाती घेतला होता. एका वर्षातच त्यांची शहरमधून उचलबांगडी करुन शाहूपुरी पोलिस ठाण्याचा चार्ज देण्यात आला.
याशिवाय शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोनि किशोर धुमाळ यांची जिल्हा वाहतुक शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हा शाखेचे पोनि एस.बी.गायकवाड यांची शहर पोलिस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. अशा आशयाचे आदेश मंगळवारी काढल्यानंतर त्याबाबत जोरदार चर्चा सुरु होती.
मंगळवारी झालेल्या या आदेशानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. बुधवारी सकाळपासूनच बदली रद्द झाल्याची चर्चा जोर धरु लागली. अखेर सांयकाळी या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून पोनि नारायण सारंगकर यांना शहर तर पोनि किशोर धुमाळ यांच्याकडे शाहूपुरी पोलिस ठाण्याचा पदभार जैसे थे ठेवण्यात आला.
पोनि एस.बी. गायकवाड हे तीन महिन्यांपूर्वी सातारा पोलिस दलात रुजू झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार असून आता त्यांची जिल्हा वाहतुक शाखेला बदली झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस दलाअंतर्गत या बदल्या झाल्या असल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |