सातारा : आंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवारी रात्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून आ. शिंदे बचावले आहेत. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकली. रात्री उशिरापर्यंत गाडी दरीतून काढण्याचे काम सुरू होते.
आमदार मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील महाबळेश्वर तालुक्यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे उपस्थित राहणार होते. रामेघर येथे जाण्यास त्यांना उशीर झाल्यामुळे त्यांची फॉर्च्युनर गाडी वेगाने निघाली होती.
या मार्गावरील रस्त्याचे काम नुकतेच झालेले आहे. त्यामुळे अजूनही काही प्रमाणात खडीचे लहान तुकडे रस्त्यावर होते. त्यावरून त्यांची गाडी घसरली. गाडीचा वेग जोरात होता. त्यामुळे ती अंधारी फाट्यानजीक असणाऱ्या एका वळणावरून काही अंतर पुढे गेली. शिंदे ज्या बाजूला बसले होते, गाडीची तीच बाजू समोर असणाऱ्या एका दरीकडे गेली. मात्र, दरीच्या सुरवातीलाच असलेल्या दोन झाडांच्यामध्ये जाऊन गाडी अडकली. शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून तत्काळ उडी मारली.
याच दरम्यान सातारा नगरपालिकेतील भाजपचे गटनेते धनंजय जांभळे तेथे आले. त्यांना ओलांडूनच शिंदे यांची गाडी पुढे आली होती. अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर ते थांबले. त्यांनी तत्काळ खाली उतरुन शिंदे यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना रामेघर येथे सोडले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |