सातारा : डॉक्टर महिलेस एका महिलेनेच काठीने मारहाण केल्याची घटना सातार्यातील शुक्रवार पेठेत घडली. वर्दळीच्या ठिकाणी दोन महिलांमधील मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार डॉ. दीपाली निकम या सध्या समर्थ हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या आर्यांग्ल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून दुचाकीने निघाल्या होत्या. संशयित अभिनेत्री खंडागळे या महिलेने तक्रारदार डॉक्टर महिलेची दुचाकी रस्त्यामध्ये अडवली. ‘तू तुझ्या नवर्याला सोडून जा, आमचा कोर्टात दावा सुरू आहे,’ असे म्हणत हातातील काठीने डॉक्टर महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याचवेळी संशयित महिलेसोबत असणार्या व्यक्तीने डॉक्टर महिलेची दुचाकी पाडून गाडीचे नुकसान केले असल्याचे डॉ. दिपाली निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, तक्रारदार डॉक्टर मारहाणीत जखमी झाल्या असून प्राथमिक उपचार सिव्हील हॉस्पिटल येथे केल्यानंतर पुढील उपचार खासगी रुग्णालयात सुरु आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ अभिनेत्री खंडागळे हिचे नाव तक्रारीत घेतले असून गाडीचे नुकसान केलेल्या संशयिताचे नाव सांगूनही त्याचा तक्रारीत अनोळखी असा उल्लेख केला आहे. यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास दि. 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉक्टर महिलेने दिला आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |