सातारा : सध्या सोशल मिडियाच्या जमान्यात ग्लोबल क्रांती झालेली आहे. एखादी गोष्ट क्षणार्धात जगभर पोहोचवायची असल्यास सोशल मिडियाचे प्रभावी माध्यम प्रत्येकाच्या हाती आलेले आहे. या माध्यमाचा कोणी सकारात्मक, तर कोणी नकारात्मक वापर करीत असल्याने या माध्यमाकडून जेवढे फायदे, तेवढेच तोटेही झालेले दिसून येतात. वीस वर्षापूर्वी सोशल मिडियाच्या ग्लोबल क्रांतीबद्दल एखाद्याने बोलले असते तरी त्याला सर्वांनी वेड्यात काढले असते, अशी परिस्थिती होती. मात्र डिजिटल क्रांती झपाट्याने झाली. कोणाच्याही खिजगणतीत नसलेले नरेंद्र मोदी सोशल मिडियाच्या प्रभावाने पंतप्रधान झाले. सोशल मिडियाच्या प्रभावामुळेच 140 वर्षाची परंपरा असलेल्या कॉंग्रेसचा 2014 साली झालेल्या निवडणुकीत सुफडासाफ झाला. मात्र असे असूनही सातारा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मात्र याला अपवाद ठरले आहेत.
खासदार उदयनराजे आणि सातारा असे समीकरण महाराष्ट्रासह देशभरात सुपरिचित आहे. देशात अनेक संस्थानिक आणि राजे-रजवाडे आहेत. परंतू यापैकी प्रसिद्धीच्या बाबतीत खासदार उदयनराजे हे नेहमीच तसुभर उजवे ठरतात. पूर्वी माध्यमे मर्यादित होती. असे असतानाही या माध्यमांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुढार्यांचा आणि राजकारण्यांचा दबदबा असायचा. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी या ना त्या कारणाने वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरचा मथळा असत. सोशल मिडियाच्या जमान्यात वृत्तपत्रांचा पूर्वी असलेला दबदबा थोडासा कमी झाला आहे. सुमारे दीड दशकापूर्वी रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुभाई अंबानींनी ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे म्हणत जनसामान्यांच्या हातात मोबाईलरुपी जग दिले. यानंतरच खर्या अर्थान जनमानसात मोबाईल लोकप्रिय झाला. नव्वदच्या दशकात एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असणारा मोबाईल एकवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामान्य माणसाच्या हातात आला आणि त्यानंतरच खर्या अर्थाने देशामध्ये डिजिटल क्रांतीचे पर्व सुरु झाले. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, व्हॉटसऍप, यू ट्यूब या सामाजिक संकेतस्थळांनी जगभरात क्रांती निर्माण केली. खर्या अर्थाने संपूर्ण जग माणसाच्या हातात सामावून गेले.
सातारा जिल्ह्यासारख्या निमशहरी जिल्हासुद्धा सोशल मिडियाने व्यापला आहे. पूर्वीच्या काळात वाचक हा तटस्थाच्या भूमिकेत असायचा. त्याला व्यक्त होण्याची संधी मिळत नव्हती. परंतू सोशल मिडियाच्या जमान्यात प्रत्येकजण आपापले मत मांडू शकतो. यामुळे खर्या अर्थाने सोशल मिडियावर लोकशाही नांदत आहे. या सोशल मिडियाचा जसा उपयोग, तसा दुरुपयोगही आहे. मात्र सोशल मिडियावर कोणाला फॉलो करायचे आणि कोणाला डिसफॉलो करायचे, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. परंतू सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार राज्यात गुगल या सर्च इंजिनवर मात्र ट्रेंडिंगवर आहेत. उदयनराजेंच्या संदर्भातील कोणतीही बातमी सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यास ही बातमी राज्यभर तुफान व्हायरल होते. कदाचितच एखाद्या राजकीय पुढार्याची उदयनराजें एवढी बातमी व्हायरल होत असेल.
खा. उदयनराजे म्हणजे खरेतर एक मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व. जे पोटात, तेच ओठावर. आपल्या खास बिनधास्त शैलीमुळे ते देशभरात प्रसिद्ध आहेत. शिवछत्रपतींच्या थेट तेराव्या वंशजाचे वलय भोवती असुनसुद्धा सरंजामी वकूब त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही नसतो. त्यामुळे सातारकरांसह राज्यातील जनतेला ते आपल्यातीलच वाटतात. कोणाचेही काहीही दु:ख असो, त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम ते निर्विवाद करीतच असतात. त्यांच्या या अनोख्या शैलीमुळे ते सोशल मिडीयावर सेलिब्रिटी झाले आहेत. एखाद्या वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राची बातमी सोशल मिडियावर झळकल्यास त्यावर लाईक्स आणि शेअरिंगचा पाऊस पडतो. गुगल सर्च इंजिन आज इंटरनेटवर अनाभिक्षित सत्ताधीश आहे. कोणताही इंटरनेट ब्राऊझर आज गुगलच्या तोडीस तोड नाही. त्यामुळे गुगलवर उदयनराजे टाईप केले की उदयनराजे संदर्भातील माहितीचा खजिना या सर्च इंजिनवर पहावयास मिळतो. फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब वर उदयनराजेंच्या संदर्भातील अनेक व्हिडिओज आणि माहिती कोट्यवधी लोकांनी लाईक आणि शेअर केली आहे. खासदार उदयनराजेंच्या जिवावर यू ट्यूबचे काही चॅनेल्स लाखो रुपये कमवित आहेत. अनेक स्थानिक वृत्तवाहिन्या तसेच यू ट्यूब चॅनेल्स उदयनराजेंच्या व्हिडिओला मीठ-मिरची लावून यू ट्यूबवर प्रसारीत करीत असतात. त्यामुळे उदयनराजे गुगलबरोबरच यू ट्यूबवरही फेमस झाले आहेत. सातार्यातील इतर पुढारी त्यांच्या याबाबतीत पासंगालाही उभे राहू शकत नाहीत. मात्र एवढे असूनसुद्धा उदयनराजे नोकिया या मोबाईल कंपनीचा एकदम साधा असा फोन वापरीत असतात. स्मार्ट फोनच्या नादाला ते शक्यतो लागत नाहीत. परंतू असे असूनसुद्धा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आजच्या घडीला गुगल ट्रेंडिंगवरही खर्या अर्थाने ‘महाराज’च ठरले आहेत.
खा. श्री. छ. उदयनराजेंच्या संदर्भातील एखादी बातमी सातारा टुडे वर प्रसिद्ध झाल्यास काही तासांतच लाखो वाचक ती बातमी वाचत असतात. याबाबतचा 'गुगल' ऍनालॅटिक्सचा रिपोर्टही सातारा टुडे कडे आहे. एखाद्या प्रादेशिक ऑनलाईन वृत्तपत्राचे काही तासांतच लाखो वाचक असतील, तर मोठमोठ्या ऑनलाईन वृत्तपत्रांचे कोट्यवधी वाचक जरुर असणारच, याबद्दल शंका नसावी. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या टीमने सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन कॉंग्रेसकडून सत्ता अक्षरश: खेचून आणली. मात्र सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदयनराजेंच्या सोशल मिडियाच्या ट्रेंडिंगच्या लोकप्रियतेचा फायदा आगामी होणार्या लोकसभा निवडणुकीत किती प्रमाणात होईल, हे मात्र त्याच वेळेस समजणार आहे.
- संग्राम निकाळजे
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |