RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कराड तालुक्‍यातून दोन जण तडीपार

02 June 2018 at 15:37

कराड : कराड तालुक्‍यातील दोघांपैकी एकावर आठ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत व अन्य एकावर एक गुन्हा दाखल असून त्यांना त्यामध्ये शिक्षा लागलेली असल्याने सहा महिन्यासाठी कराड तालुक्‍यातून तडीपार करण्याबाबत आदेश पारित केला आहे.बापू उर्फ बाप्या जयपाल चांदणे (रा. 302, बुधवार पेठ, कराड) हरिष दिलीप नांगरे (रा. पार्ले ता. कराड) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बापू चांदणे याच्यावर आठ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तर हरिष नांगरे याच्यावर एक गुन्हा दाखल असून त्यांना त्यामध्ये शिक्षा लागलेली असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावाची सुनावणी करून या दोघांना कराड तालुक्‍यातून सहा महिन्याकरीता तडीपार करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे.

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before