सातारा : लिंबखिंड ( नागेवाडी ) ता. सातारा येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास एका परप्रांतीय व्यक्तीचा खून झाल्याचे सकाळच्या सुमारास समजताच परिसरात खळबळ उडाली असून खून करणारा संशयित पसार झाला होता त्यास सातारा तालुका पोलिसांनी लोणावळा जि, पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लिंबखिंड येथील जाधव यांच्या क्रशर मशीनवर कामास असणाऱ्या डब्लूकुमार रामसुंदर सिंह वय 38 र पटना बिहार याचा रात्रीच्या सुमारास डोक्यामध्ये अज्ञात हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पो नि हंकारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
डब्लूकुमार सिंह हा सोमवारी रात्रीच्या सुमारास कन्हैयाकुमार हवारी हे दोघे विक्रम जाधव यांच्या क्रशर मशीनवर कामगार आहेत, दोघेही बिहार मधील असून दोघे नात्याने मामा भाचे आहेत.
सोमवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर त्यांचा पगार झाला होता, रात्रीच्या वेळी दोघांनी भरपूर दारु पिले यानंतर त्यांच्यामध्ये काही कारणाने भांडण झाल्याने संशयित आरोपी कन्हैयाकुमारने डब्लूकुमार याला डोक्यात अज्ञात हत्याराने वार करून गंभीर जखमी केले , यानंतर संशयित कन्हैयाकुमार पळून गेला असा संशय पोलिसांनी व्यक्त केला, तर गंभीर जखमी झालेल्या डब्लूकुमार याचा जागेवरच मृत्यू झाला,पोलिसांनी डब्लूकुमार याचा भाचा कन्हैयाकुमार याच्यावर संशय व्यक्त केला,
माहिती घेऊन पोलीस संशयित आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मार्गस्थ केले,पो नि हंकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी संशयित कन्हैयाकुमार हा रेल्वेने प्रवास करत पसार होत असल्याचे आपल्या टीमला सांगत मार्गदर्शन करीत असताना संशयित आरोपीस पो ह राजू मुलाणी, सुजित भोसले, रमेश चव्हाण, दादा परिहार यांनी संशयित आरोपी कन्हैयाकुमार हवारी यास लोणावळा जि पुणे येथील रेल्वे स्थानकवरून ताब्यात घेतला.
खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपीस काही तासातच पो नि हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते, विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले. या गुन्ह्याचा तपास पो. नि सजन हंकारे करीत आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |