11:15pm | May 31, 2018 |
सातारा : विसापूर, (ता. खटाव) गावातील मागासवर्गीय स्मशानभूमीतून शेतात जाण्यासाठी जबरदस्तीने रस्ता काढून अतिक्रमण करण्यात आले आहे. बौध्द समाजाची ही पिढीजात स्मशानभूमी असून ती रस्त्या काढण्यासाठी उत्खनन करुन उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची विहिर बळकावून आमच्यावर अन्याय करण्यात आला असून याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी विसापूर येथील बौध्दजन ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व बौध्द समाजातील असून गावातील तुकाराम ज्ञानदेव जरग व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा तुकाराम जरग यांनी आमच्या पिढीजात स्मशानभूमीतून स्वतःच्या शेतात जाण्यासाठी दहशत माजवून जबरदस्तीने रस्ता काढला आहे. मुळात कमी असलेल्या स्मशानभूमीत रस्ता काढण्यात आल्याने बौध्द समाजाला स्मशानभूमीच शिल्लक राहिलेली नाही. हे अतिक्रमण करणाऱ्या स्वतः ग्रामपंचायत सदस्या असल्याने ग्रामपंचायतीने आमची लेखी व तोंडी कसल्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही.
यापूर्वी तुकाराम ज्ञानदेव जरग यांनी बौध्द समाजाला विशेष घटक योजनेतून मिळालेली पिण्याच्या पाण्याची विहीर बळकावली आहे. त्याबाबत तक्रारी केल्यावर उलट बौध्द समाजातील ग्रामस्थांवरच केसेस दाखल केल्या. या विहिरीचा वापर ते स्वतःच्या शेतीसाठी करत आहेत. याबाबत आम्ही न्यायालयात गेले असता कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बौध्द ग्रामस्थांच्या बाजूने झालेला आहे. तुकाराम जरग यांनी या विशेष घटक योजनेच्या विहिरीवर स्वतंत्र वीज कनेक्शन टाकून पाण्याचा वापर करत असल्याने बौध्द समाज पाण्यापासून वंचित आहे. मुळात वीज मंडळाने त्यांना दिलेले वीज कनेक्शन चुकीच्या पध्दतीने दिले असून त्याचीही चौकशी व्हावी. मागासवर्गीय ग्रामस्थांवर दहशत माजवून त्रास देणाऱ्या या पती, पत्नीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी बौध्द समाजातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनावर सर्व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱया आहेत. निवेदनाच्या प्रती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले, समाजकल्याण मंत्री, मागासवर्गीय आयोग, जिल्हा पोलीस प्रमुख, खटाव तहसीलदार व पुसेगाव पोलीस ठाण्यासही देण्यात आल्या आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |