कोरेगाव : भाटमवाडी, ता. कोरेगाव येथे अडीच एकर जमीन माझ्या नावावर करून दे, नाहीतर अडीच लाख रूपये खंडणी म्हणून दे, असे म्हणून जर तू मला पैसे नाही दिले तर आजपासून तू जमिनीत जायचे नाही, नाहीतर तुला व तुझ्या नातवाला जिवे मारीन, अशी धमकी देवून अडीच लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे.
याबाबत कोरेगाव पोलीस सूत्रांनी सांगितले की, भाटमवाडी, ता. कोरेगाव येथील रामोशी, समाजाचा गोजाबा भगवंत बुधावले (वय 89) हा शेतकरी भाटमवाडी येथे मुलगा मेघनाथ, सून, नातू अमित तीन नाती असे एकत्रितपणे राहतो आणि शेती करतो. त्या शेतकर्याला 13 एकर शेतजमीन आहे. तसेच त्याला सात मुलीदेखील आहेत. त्यातील मंगल सयाजी मदने रा. आवारवाडी, ता. खटाव हिला सदरची 13 एकर जमीन सन 2010 साली पाच वर्षाकरिता कसण्यासाठी दिली होती. तसा करार लेखी स्टँपवर त्यावेळी केलेला होता. ती जमीन कसून त्यातून वडिलांच्या म्हणजेच गोजाबा बुधावले यांच्या नावचे गावच्या सोसायटीचे दोन लाख पन्नास हजार रूपयांचे थकीत कर्ज फेडण्याचे त्या करारात ठरवले होते, असे सांगितले होते. मात्र ठरल्याप्रमाणे 2 लाख 50 हजार रूपयाचे सोसायटीचे कर्ज फेडले गेले नाही. त्यानंतर एक वर्षापूर्वी गुजाबा बुधावले याला जिहे-कठापूर योजनेचे 9 लाख 50 रूपये भेटले होते. त्यातील दोन लाख 50 हजार रूपयांचे कर्ज गुजाबा बुधावले यांनीच फेडले व त्यांच्या मालकीची भाटमवाडी येथील शेतजमीन कसण्यास त्यांनी सुरवात केली. याबाबत त्यांची मुलगी मंगल सयाजी मदने हिला आणि तिच्या कुटुंबियाला दिली होती. मात्र दि. 28 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11.30 वा. गोजाबा बुधावले घरात असताना मुलगी मंगल सयाजी मदने हिचा मुलगा अविनाश सयाजी मदने रा. आवारवाडी, ता. खटाव हा आणि त्याचा मामेभाऊ संभाजी भानुदास बुधावले रा. बुधावलेवाडी, ता. खटाव हे दोघेजण वडाचीवाडी येथे आले.
त्यांनी गोजाबा बुधावले यांना बाहेर येण्यास सांगून अडीच एकर जमीन माझे नावे कर नाहीतर अडीच लाख रूपये खंडणी दे, असे धमकावून नातवास जिवे मारण्याची धमकी दिली. आणि शेतीत पाय न ठेवण्याचा सज्जड दम दिला. अशी तक्रार फिर्यादी गोजाबा बुधावले यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |