वाठार स्टेशन : देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे.
श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी प्रसंगावधान दाखवून गाडीत बसलेल्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह एकूण पाचजणांची जवान विशाल पवार यांनी सुखरूप सुटका केली.
विशाल पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात चालक पदावर कार्यरत आहेत. सध्या ते श्रीनगर या संवेदनशील ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. दि. २ जून रोजी विशाल पवार हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एमआर गंज या ठिकाणाहून नव्हाटा शहरातून कॅम्पकडे निघाले होते. या शहरातील एका चौकात येताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने त्यांच्या गाडीवर दगडाचा मारा सुरू केला.
विशाल पवार यांनी प्रसंगावधान दाखवत आपली गाडी हळूहळू बाहेर काढली. मात्र ही गाडी खाँजा बाजार चौकात येताच गर्दी अजूनच वाढली. यामुळे या गर्दीतून वाट काढण्यासाठी त्यांना दोन मिनिटे गाडी उभी करावी लागली. यावेळी जमावातील काही लोकांनी या गाडीचा दरवाजा उघडला आणि अधिकऱ्यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.
परंतु गाडीत पाठीमागे बसलेल्या जवानाने दरवाजा बंद करण्यात यश मिळवले. यावेळी विशाल पवार यांचे या सर्व बाबींवर लक्ष होते. त्यामुळे ते आपली गाडी हळूहळू पुढे घेत होते. अखेर मोठ्या धाडसाने त्यांनी आपली गाडी जमावातून बाहेर काढून आपल्या सहकाऱ्यांना कॅम्पपर्यंत सुखरूप पोहोचविले. त्यांच्या या कामगिरीचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |