सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे एका महिलेने माझ्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसताना माझ्या बदनामीच्या हेतूने तक्रारअर्ज दिलेला होता. त्यानुसार सातारा येथील माध्यमांमध्ये या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. परंतू ज्या महिलेने ही तक्रार माझ्या विरोधात केली आहे, त्यास कोणत्याही प्रकारचा आधार नाही. त्यामुळे हे आरोप धादांत खोटे आहेत, असा खुलासा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सातारा टुडेच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरुन बोलताना केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यावर दि. 20 मार्च रोजी येथील एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करुन तक्रारअर्ज जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे दिलेला होता. या तक्रारअर्जामध्ये संबंधित महिलेने लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. तसेच न्याय मिळाल्यास 23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशाराही दिला होता. या संदर्भात सातारामधील माध्यमांमध्ये बातम्याही प्रकाशित झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने आनंद भंडारी यांनी सातारा टुडे शी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना भंडारी म्हणाले, संबंधित महिलेला आतापर्यंत मी कधीच भेटलेलो नाही. रोज शेकडो लोक विविध प्रश्नासंदर्भात मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात येत असतात. त्यामुळे कोण कोणत्या हेतूने भेटायला आलेला आहे, हे ओळखणे कठीण असते.
कदाचित ही महिलाही मला कार्यालयात भेटायला आली असेल. याबाबत मला पूर्णपणे काहीही माहित नाही. माझ्यावर या महिलेने यापूर्वीही आरोप केलेले होते. याबाबत सातारा पोलिसांना कोणतेही ठोस सत्यता वाटली नसल्यामुळे सातारा पोलिसांनी या महिलेचे अर्ज निकाली काढले होते. परंतू कोणाच्या तरी सांगण्यावरुन संबंधित महिलेने माझ्यावर बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यामुळे माझे सामाजिक चरित्रहनन करण्याचा हा प्रयत्न आहे. सातारा पोलिसांनी यापूर्वीही या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळून न आल्याने या महिलेचे अर्ज निकाली काढले आहेत. त्यामुळे या न घडलेल्या धादांत खोट्या आरोपावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |