सातारा : शिवनातू आणि छावापुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेबाच्यापश्चात ८ मे १७०७ रोजी मोघलांच्या छावणीतून सुटले. या घटनेला ३११ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते किल्ले अजिंक्याताऱ्याच्या महादरवाजावर हा ऐतिहासिक क्षण दक्ष विचार मंचच्यावतीने पूर्वनियोजित कार्यक्रमात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक वसंत लेवे, सविता फाळके, सुनिता पवार, इतिहास संशोधक घनशाम ढाणे, जिज्ञासाचे निलेश पंडीत, महेश माने, महेश पवार, प्रमोद नलावडे आणि शिवप्रेमी सातारकर बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शिवनादाने आसमंत दुमदमून गेला होता.
यावेळी नगराध्यक्षा सौ. कदम म्हणाल्या, मराठी रयतेवर साडेतीनशे वर्षानंतरही अधिराज्य करणारे शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा आपल्या रक्ताने अभिषेक करणारे संभाजीराजे सर्वश्रुत आहेत. बालवयात मातोश्री आणि अन्य स्वकीयांसह औरंगजेबाच्या कैदेत गेलेले स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहूराजे १६८९ ते १७०७ अशा १८ वर्षाच्या कैदेतून मराठी मनाला आधार देताना साम्राज्यविस्तार करण्यासाठी ८ मे १७०७ रोजी सुटले आणि स्वकीयांचा हल्ला मोडीत काढून तदनंतर अजिंक्यताऱ्यावर स्थिरावले. येथूनच स्वराज्याचा साम्राज्यविस्तार झाला. हा दिवस इतिहासात दुर्लक्षित असल्याने अजिंक्यताऱ्यावर सातारा निर्मात्या शाहू राजेंचा जयघोष दक्ष विचार मंचच्यावतीने करण्यात आला, हे कौतुकास्पद आहे. यापुढे छ. शाहू जयंती पालिकेच्यावतीने साजरी करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे सांगताना दक्ष विचारमंचने मांडलेल्या साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन-जतन करण्याच्या भूमिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तदनंतर घनशाम ढाणे यांनी छ. शाहू काळातील माहीतीचा अल्पावधीत जागर केला. अनेक प्रसंग सांगत शाहू महाराजांचे मुत्सद्दी धोरण त्यांनी मांडले. शहर स्थापनेपासून ते स्वराज्य विस्तार याची माहीती ढाणेंनी उपस्थितांना दिली. यावेळी छत्रपती शाहूंराजेंच्या प्रतिमेला अभिवादन करून शिवनाद करण्यात आला. ओमकार तपासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर गुरुदास आडागळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रेमी अरबाझ शेख यांनी शिव ललकारी देत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. यावेळी पद्माकर सोळवंडे, कुणाल पाटोळे, माँटी पुरुसवाणी आणि छत्रपती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारच्या रणरणत्या उन्हात शिवललकारी सुरु होताच किल्ल्यावर आलेले पर्यटकही काही वेळासाठी विसावले. छ. शाहू आणि छावणीतून सुटकेची त्रिशताब्दी याबाबत अनेकांनी उत्सुकतेने जाणून घेत हा इतिहास व्यापक स्वरुपात पुढे येताना दक्ष विचार मंचकडून सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |