सिडनी : भारताची १८ वर्षीय नेमबाज एलावेनिल वालारिवनने गुरुवारी आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमाची नोंद करून सुवर्णपदकाची कमाई केली. गुरुवार एलावेनिलसाठी संस्मरणीय ठरला; कारण याच गटातील सांघिक स्पर्धेत तिने श्रेया अग्रवाल आणि झीना खितासह सुवर्णपदकाची कमाई करून दाखवली. याच दरम्यान अर्जुन बाबुताने ज्युनियर वर्ल्ड कपमधील आपले दुसरे पदक या स्पर्धेतून मिळवले. त्याने मुलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये ब्राँझची कमाई केली.
एलावेनिलची ही कारकिर्दीतील दुसरी वर्ल्ड कप स्पर्धा होती, तर या स्पर्धेतील फायनलमध्ये सहभागी घेण्याची मात्र तिची ही पहिलीच वेळ होती. तिने मुलींच्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत २४९.८ गुणांची कमाई करून सुवर्णपदकावर नाव कोरले. प्राथमिक फेरीत तिने केलेली ६३१.४ गुणांची कमाई ही विक्रमी ठरली. आदल्या शॉटमध्ये ९.६ गुणांची कमाई करणाऱ्या एलावेनिलने सुवर्ण निश्चित केले ते १०.७ गुणांच्या २४व्या शॉट्सने. असा पराक्रम करताना तिने तैपईच्या लिन यिंग शिन हिला मागे टाकले. 'गेल्या काही महिन्यांपासून कामगिरी उंचावलेल्याचा अनुभव येत होता. त्यामुळे पुढील स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी होईल, असा विश्वास वाटतच होता. सिडनीतील या कामगिरीचा साहजिकच खूप मोठा आनंद आहे,' अशी प्रतिक्रिया एलावेनिलने दिली. तैपेईच्या लिन यिंग-शिनने २४८.७ गुणांसह रौप्यपदक, तर चीनच्या वांग झेरूने २२८.४ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. पात्रता फेरीत वांग ६२१.६ गुणांसह आठव्या स्थानावर राहिली होती.
गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या एफआयएसयू जागतिक नेमबाजी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत एलोवेनिलने ब्राँझपदकाची कमाई केली होती. एलावेनिलने सुवर्णपदक पटकावलेल्या दहा मीटर एअर रायफलच्या फायनलमध्ये भारताच्या श्रेया आणि झीना अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या आल्या. त्यांची आणि एलावेनिलची एकत्र कामगिरी भारताला सांघिक सुवर्णपदक पटकावून देण्यासाठी पुरेशी ठरली. लिन, साय यि तिंग आणि हंग चेन चिंग यांच्या समावेश असलेल्या तैपईच्या संघाने रौप्य, तर हू, वांग आणि गाओ यांच्या चीन संघाला ब्राँझवर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत एलावेनिलने ६३१.४ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. त्याचबरोबर हा जागतिक विक्रमही ठरला. तैपेईची लिन ६२९.७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. झीना ६२३.१ गुणांसह सहाव्या, तर श्रेया ६२२.० गुणांसह सातव्या स्थानी राहिली होती. अंतिम फेरीत श्रेया १६ शॉट्सनंतर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली, तर झीना १४ शॉट्सनंतर बाहेर पडली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |