11:49pm | Apr 08, 2019 |
कराड : नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे नरेंद्र मोदींचे सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या पंतप्रधानास राफेलची फाईल व्यवस्थित सांभाळता येत नाही. ती व्यक्ती देश कसा सुरक्षित ठेवेल, असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाही. असे प्रतिपादन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वडगाव हवेली (ता. कराड) येथे काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार श्री.छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. खा. उदयनराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ.आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, सुनील काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर, आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, मनोहर शिंदे, निमंत्रक जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवराज मोरे, जयेश मोहिते, विद्याताई थोरवडे, नीलम येडगे, उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, जितेंद्र डुबल, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र पाटील, नितीन पाटील, वैभव थोरात, नितीन थोरात, सचिन पाटील, दत्ता पवार, झाकीर पठाण, संतोष पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आ.चव्हाण म्हणाले, जीएसटीची काँग्रेसने चांगली कल्पना आणली होती. देशात समान जीएसटी ठेवायचा होता. पण मोदींच्या दुष्टग्रहामुळे जीएसटीची अंमलबजावणी खूप किचकट केली. गेल्यावर्षी एक कोटी नोकर्या नष्ट झाल्या. नवीन रोजगार निर्माण झाला नाही. कागदाचे विमान बनवण्याचा अनुभव नसणार्या अनिल अंबानींना 30 हजार कोटींचे विमान बनवण्याचे टेंडर दिले.
खा.उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींची मन की बात नव्हती. तर ती धन की बात होती. महात्मा गांधींच्या धोरणामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणातून लोकशाही निर्माण केली. पण गेल्या पाच वर्षात भाजपने विकेंद्रीकरणाचे केंद्रीकरण केले. व त्यातून हुकूमशाही वाढवली.
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी जोमाने निवडणुकीत काम करावे. बूथनुसार विजयासाठी प्रयत्न करावेत. निवडणुकीआधी काही थापा व अमिषे येतील, त्याला बळी पडू नका. डॉ.इंद्रजीत मोहिते यांचेही भाषण झाले. जयवंतराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुधीर जगताप यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |