02:12am | Apr 17, 2018 |
फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी ता. फलटण या साखर कारखान्याच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आगामी 2/4 दिवसात एकत्र बसून चर्चा करण्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, प्रल्हादराव साळुंखे पाटील यांना आज (सोमवार) सकाळी दिले आहे.
न्यू फलटण शुगर वर्क्सने यावर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या ऊसाचे पेमेंट बाबत अस्थिरता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी गोविंद बाग, बारामती येथे खा. शरद पवार यांची भेट घेवून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले आहे.
न्यू फलटण शुगर वर्क्सने या वर्षीच्या हंगामात 2 लाख 85 हजार मे.टन ऊसाचे गाळप केले असून दि. 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाचे प्रतिटन 2650 रुपयांप्रमाणे पेमेंट केले मात्र त्यानंतरच्या ऊसाचे पेमेंट अद्याप झाले नसल्याने या कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांची मोठी आर्थिक कोंडी झाल्याने सदर ऊस उत्पादक शेतकरी स्वत: आणि विविध संघटनांच्या माध्यमातून ऊस पेमेंटसाठी आग्रही आहेत. साखर आयुक्त कार्यालयानेही नियमाप्रमाणे गाळपानंतर 15 दिवसात पेमेंट करण्याची आवश्यकता असताना अद्याप पेमेंट केले नसल्याबाबत कारखाना प्रशासनाकडे विचारणा केली आहे.
तथापी कारखान्याने सुमारे 80 वर्षाची जुनी मशिनरी बाजूला ठेवून नवीन प्रतिदिन 4 हजार मे.टन गाळप क्षमतेची मशिनरी उभारल्याने आणि सदर मशिनरी उभारण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या 2/3 वर्षात सतत गाळप कमी होणे, साखरेच्या दरातील घसरण व अन्य अडचणीमुळे कारखाना आर्थिक संकटात सोपडला असल्याने इच्छा असूनही यावर्षी ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचे पेमेंट वेळेवर देवू न शकल्याने कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे (पाटील) अस्वस्थ झाले असून पेमेंटसाठी विविध मार्गाने सतत प्रयत्नशील आहेत. त्यादरम्यान वरचेवर खा. शरद पवार यांची भेट घेवून त्यांच्या सल्ल्याने आपले प्रयत्न त्यांनी सुरु ठेवले आहेत. मात्र सर्व समावेशक निर्णय अध्याप झाला नसल्याने आज सोमवारी सकाळी त्यांनी खा. शरद पवार यांची भेट घेवून संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत कोणत्याही परिस्थितीत ऊसाचे पेमेंट तातडीने करण्याची आवश्यकता त्यांच्याजवळ स्पष्टपणे बोलून दाखविली.
खा. शरद पवार दिल्लीस जाणार असल्याने तेथून परतल्यानंतर आगामी दोन दिवसात मुंबईत बैठक घेवून यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांना दिले आहे. तथापी आपण आपल्याकडील विविध मार्गाने ऊस उत्पादक शेतकर्यांना तातडीने पेेमेंट करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठीही खा. पवार साहेब यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे. कोणत्याही परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचे पेमेंट देण्यासाठी आपण बांधील असून प्रयत्नशील आहोत कोणत्याही शेतकर्यांनी गैरविश्वास न दाखवता आतापर्यंत दाखविलेला विश्वास आणि त्याला पात्र राहुन आपण केलेल्या गेल्या 8/10 वर्षातील सकारात्मक भूमिकेची नोंद घेवून सहकार्य करावे सर्वांना पेमेंट दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |