कराड : कराड शहरातील भेदा चौक ते विजय दिवस चौक व नवग्रह मंदिर ते इदगाह रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या सुमारे 61 लाख रुपयांच्या कामाचा ठराव 16 जुलै महिन्यात झालेला आहे. तर 15 नोव्हेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरु आहे. 2 डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होऊन या कामांना प्रारंभ होणार आहे. सवंग लोकप्रियतेसाठी आंदोलने करणा-या लोकांनी याची माहिती घेतली असती तर आंदोलनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.
कराड नगरपरिषदेच्या 16 जुलैच्या सर्व साधारण सभेत ठराव क्र 2/57 अन्वये विजय दिवस चौक ते भेदा चौक रस्ता खडीकरण व डांबरीकरण अंदाजपत्रकीय रक्कम रु 37.15 लक्ष व नवग्रह मंदिरापासून इदगाह रस्तास मिळणारा रस्ता अंदाजपत्रकीय रक्कम रु 24.15 लक्ष रु किमतीच्या कामांना मंजुरी दिली आहे. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सदर कामाची निविदा एका दैनिक वृत्तपत्रात नगरपरिषदे मार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील 2 डिसेंबर पर्यंत निविदा अंतिम होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. ते सुशोभित करण्यात येणार आहेत. पाऊस लांबल्याने या कामांना विलंब झाला होता. मात्र आता ही कामे गतीने होणार आहेत.
परंतु शहरातील काही आंदोलक नगरपालिकेकडे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत, मागणी करून दुरावस्थाबाबत देखील नगरपालिका हा रस्ता दुरुस्त करत नाही, असा आव आणून आदोलन करीत आहेत. नागरिकांची दिशाभूल करत आहेत. हे दुर्दैवी आहे. मुळात या आंदोलनची नगरपालिकेकडे या रस्त्याच्या दुरुस्ती करावी, याबाबत कोणतीही मागणी नगरपालिकेच्या रेकॉर्डवर नाही. आंदोलनातून प्रश्न सुटतात हा कराडमध्ये लागलेला नवीन शोध दिसतोय. टेंडर प्रक्रिया सुरु असून येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होणार असताना आंदोलन करण्याचा हेतू काय? अशी शंका निर्माण होते आहे.
कराड शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध आहोत. मागील 3 वर्षात शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला आहे. करणार आहोत. अशी हमी हि कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सवंग लोकप्रियतेसाठी होणार्या आंदोलनाबाबत खंत व्यक्त केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |