कराड : कराड शहरातील कृष्णा पूल, साईबाबा मंदिर ते कार्वे पुलादरम्यानच्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी; अन्यथा 20 नोव्हेंबर रोजी कृष्णा पुलावर रस्ता रोको करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, उपजिल्हाध्यक्ष सुनील कोळी, तालुकाध्यक्ष उत्तम खबाले, दक्षिणेचे अध्यक्ष सागर कांबळे, राजू मुल्ला, किशोर लादे, सुरेश सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जुना कृष्णा पुल पडल्याने नवीन कृष्णा पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. त्यातच पुलावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसचे कराड-तासगाव रस्त्यावर कार्वे रस्त्यावरही मोठया प्रमाणात खडृडे पडले आहेत. कार्वे पुलावरही खड्डे पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. खड्डयांमुळे वारंवार अपघात होत असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लवकरच ऊस गळीत हंगाम सुरु होत आहे. नवीन कृष्णा पुलावरची वाहतूक कोंडी नित्याची समस्या झाली आहे. वाहतूक कोंडीचा नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता या मार्गावरुन ऊस वाहतूक सुरु झाल्यावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक वाढणार आहे. या सर्व समस्यांवर तातडीने तोडगा काढला नाही तर 20 नोव्हें रोजी सकाळी अकरा वाजता कृष्णा पुलावर रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |