02:22am | Jan 13, 2020 |
सातारा : पहाटेचा थंडगार वारा... किल्ले अजिंक्यताऱयाला बांधलेले तोरण... ज्योत पेटवून धावणारे सातारकर, भगवे ध्वज-पताका अन् विविध वेशभुषा परिधान केलेले चिमुकले यामुळे राजसदरेवर जणू काही शिवकाल अवतरला होता. निमित्त होते, ‘सातारा स्वाभिमान दिवसा'चे... छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर 12 जानेवारीला झाला. तो दिवस स्वाभिमान दिवस म्हणून सातारकरांनी मोठय़ा दिमाखात साजरा केला. यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांना, माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो सातारकरांची भल्या पहाटे किल्ले अजिंक्यताऱयावर उपस्थिती होती. अवघ्या काही लोकांपर्यंत सुरू झालेला हा दिवस आता हजारोंच्या उपस्थितीत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
इतिहासात मराठय़ांनी जे अटकेपार झेंडे लावले. त्या मोहिमेचा आदेश साताऱयाच्या किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवरून देण्यात आला होता. किल्ले अज्ंिाक्यताऱयाला वेगळे महत्त्व अधोरेखित आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्यभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर दि. 12 जानेवारीला झाला. आणि त्याच दिवशी अजिंक्यतारा ही राजधानी बनली गेली. शाहू महाराजांनी सातारा शहर वसवले. त्यांच्या पराक्रमांना उजाळा मिळावा याकरीता साताऱयातल्या शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही स्वाभिमान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजसदरेवर इतिहासकार प्रा. के. एन. देसाई, इतिहास अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरूजी, इतिहासप्रेमी अजय जाधवराव, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नगरसेवक अविनाश कदम, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, अध्यक्ष दीपक प्रभावळकर, प्रशांत अहिराव, अविनाश पोळ, रवी पवार, नितेश भोसले, संदीपभाऊ शिंदे, जयश्री शेलार, डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अमरदादा जाधव, सुतगिरणीचे अध्यक्ष नावडकर, राम हदगे, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पहाटे थंडी असली तरी स्वाभिमानी दिन साजरा करण्यासाठी सकाळी 6 वाजता जिजाऊंच्या लेकी, हिल मॅरेथॉनच्या यंदाच्या नवीन महिला पदाधिकारी, सातारा-कास हेरिटेज मॅरेथॉनचे पदाधिकारी आणि रनर्स यांनी शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून ज्योत पेटवली. ही ज्योत घेवून किल्ले अजिंक्यताऱयाच्या दिशेने रनर्स धावत निघाले. दाट धुक्यातून धावताना जय जिजाऊ, जय शिवरायच्या नावाचा जयघोष सुरू होता. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी किल्ले अजिंक्यताऱयावर सर्व रनर्स पोहचले. यावेळी त्यांचे स्वागत पारंपारिक वाद्य वाजवून करण्यात आले. या वाद्यांचा आवाज कानावर पडल्याने रनर्सचा जोश आणखी वाढला होता. ही ज्योत घेवून सर्व रनर्स राजसदरेवर पोहचले. राजसदरेवर राजमाता जिजाऊ आणि शाहू महाराज यांच्या प्रतिमेजवळ ज्योत ठेवण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी राजसदरेवर शेकडो सातारकर उपस्थित राहिले होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
याप्रसंगी नगरसेवक धनजंय जांभळे, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलवडे, पहिल्या आर्यन लेडी डॉ. सुचित्रा काटे, पत्रकार प्रगती जाधव पाटील, स्मितल प्रभावळकर, मनसेचे सातारा शहर प्रमुख राहूल पवार, अभिजीत बारटक्के, गणेश विभुते, अमोल शेंडे, हैदर पटेल, सतिश चव्हाण, किरण शिंदे, वसीम सौदागर, सागर भोसले, अनिरूद्ध पवार, महेश घोरपडे, तेजस काकडे, वैभव रासकर, बंटी सर्वे, अक्षय पवार, सागर काशिद, कुणाल मुळे, अनिकेत कदम, मुधाजी गायकवाड, विजय जाधव आदी उपस्थित होते.
सजला होता अजिंक्यतारा
सातारा स्वाभिमान दिनानिमित्त संपूर्ण अजिंक्यताऱयाला सजवण्यात आले होते. किल्ल्याच्या महाद्वार व दोन्ही बुरुज फुलांच्या तोरणांनी उठून दिसत असल्याने रविवारी हा सेल्फी पॉईंट बनला होता. मुख्यद्वारापासून राजसदरेपर्यंत दुतर्फा रांगोळी काढून मार्गनिश्चिती केली होती.
राजसदरेला गतवैभव यावे
पडका वाडा असा अपप्रचार झालेल्या राजसदरेला गेल्या आठ वर्षात मूर्तरुप येवू लागले आहे. यंदा राजसदर फुलांनी मडवण्यात आली होती. तर गेल्या पाच दिवसांपासून राजसदरेवरील झुडपे हटवण्यासाठी समितीचे पदाधिकारी श्रमदान करत होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |