06:09pm | Apr 18, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपात आयात झालेले ‘पॅकेज पोपट’ घडाघडा बोलू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दरबारात स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी बेंबीच्या देठापासून ज्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने समाजात ओळख दिली, त्याच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला हे पोपट दूषणे देवू लागले आहेत. त्यामुळे पॅकेज पोपटांच्या या ना इन्साफीमुळे नीतीमत्ताही ओशाळली आहे.
देशाला आणि राज्याला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने केले आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीर, क्रांतिसिंह नाना पाटील, शरद पवार, प्रतापराव भोसले, प्रमिलाकाकी चव्हाण अशा राजकीय धुरिणांनी सातारचा दबदबा देशपातळीवर ठेवला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण या सातारच्या मातीतील मुख्यमंत्र्यांनी राज्याला दिशा दिली. अशा सातारा जिल्ह्याला आता राजकीय घरघर लागली आहे. कोणी नागपुरचे, कोणी मातोश्रीचे मांडलिकत्व स्विकारले आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपतींच्या आदेशाने पेशव्यांनी मराठेशाहीचे अटकेपार झेंडे रोवले. तीच सातारची भूमी पुन्हा मांडलिकत्वाच्या जोखडाखाली पिचलेली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा काबिज करण्याचा विडा उचललेला आहे. त्यासाठी साम-दाम-दंड ही नीती वापरण्यात येत आहे. सातारचे खासदार उदयनराजे यांना गळाला लावण्यासाठी थेट मोदी-शहांपासून फिल्डिंग लावली गेली. भिडे गुरुजींची शिष्टाई यात फळाला आली नाही. शेवटी उदयनराजेंनी पवारांचे घड्याळच हातात बांधायचे फायनल केल्यानंतर महायुतीला ऐनवेळी उमेदवार चाचपण्याची वेळ आली. कराड दक्षिणेतून अतुल भोसले, उत्तरेतून मनोज घोरपडे, पाटणमधील मंद्रुळकोळे येथे यात्रेपुरते येणारे नरेंद्र पाटील, वाईतून किसन वीर वाढवता वाढवता दमछाक झालेले मदन भोसले, जावलीतून दीपक पवार, माण-खटावमधून शेखर गोरे व शेवटी माढ्यातून लोकसभेला उभे केलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर ही आयारामांची फौज भाजपने गोळा केलेली आहे. तरीही सातार्यात भाजपचा वारु म्हणावा इतका दौडताना दिसत नाही. उदयनराजे विरोधात शिवसेनेसह संपूर्ण महायुती एकवटलेली आहे. तरीही उदयनराजे अभेद्य आहेत, अशी स्थिती सध्यातरी सातारा मतदारसंघात दिसत आहे.
मूळचे कोल्हापूरचे असणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सातार्यात मोठा ‘इंटरेस्ट’ घेतला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधून डेरेदाखल झालेल्या आयारामांना मनसबदारी देवून भाजपचे कमळ ते जिल्ह्यात फुलवू पाहत आहेत. त्यामुळे या आयारामांचाही भाव चांगलाच वधारलेला आहे. जिहे-कठापूर, वसना-वांगणाच्या पाण्यावरुन राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांसमोर जिहे-कठापूर, वसना-वांगणापासून अनेकांनी मुख्यमंत्र्यासमोर आम्हाला पाणी प्रश्नाचे खूप काही कळते, अशाप्रकारची पोपटपंची केली. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. कोण, किती पाण्यात आहे, ते त्यांना चांगलेच माहित आहे. शेवटी बेंबीच्या देठापासून कोकलणारे हे शेवटी पॅकेज पोपटच आहेत, याची त्यांना चांगली कल्पना आहे. मात्र वारंवार लायकीपेक्षा जास्त बोलून हे पॅकेज पोपट स्वत:ची लायकी दाखवून देत आहेत, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधूनच होवू लागली आहे. कोणी कारखाना वाचविण्यासाठी, तर कोणी केलेले पाप झाकण्यासाठी भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांशी सलगी साधण्यासाठी हेच पॅकेज पोपट मुख्यमंत्र्यांवर मात्र ‘शायनिंग’ मारत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |