01:36am | Apr 09, 2019 |
पाटण : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये आज सोमवारी आयॊजित रोड शो व रॅलीला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
खा. श्री.छ.उदयनराजे भोसले, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जि.प.सदस्य रमेश पाटील, बापूराव जाधव, पं.स.उपसभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबन कांबळे, दिनकरराव घाडगे, सुभाष पवार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, सुनील काटकर, डाॅ. शेखर घोरपडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान, उदयनराजे यांच्या संपर्क व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री.छ.उदयनराजे भोसले, सत्यजितसिंह पाटणकर, रमेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटणचे उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, स्नेहलताई जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील दादासाहेब पाटणकर हायस्कुलगतच्या केरा पुलापासून सुरू झालेल्या या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उघड्या मोटारीतून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आदींनी नागरिकांना अभिवादन करीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच विजयी करण्याचे आवाहन केले.
ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत राष्ट्रवादीच्या कार्यालयापर्यंत आली. वाटेत ठिकठिकाणी फटाके वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन नागरिक श्री. छ. उदयनराजे भोसले व मान्यवरांचे स्वागत करीत होते. याशिवाय चौक चौकात औक्षण करून महिला विजयी भव अश्या सदिच्छा व्यक्त करीत होत्या. रॅलीत सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले मफलर व कॅप घालून जोरदार घोषणा घोषणा देत होते.
रॅली व रोडशोच्या सांगतेवेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी विक्रमसिंह पाटणकर म्हणाले की, या निवडणुकीत महाराज निश्चितच खासदारकीची हॅटट्रिक करणार असून, संपूर्ण देशात त्यांना प्रथम क्रमांकाचे मताधिक्य देण्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करावेत.
स्पीकर जोडलेल्या रिक्षातून सुरु असलेला प्रचार आणि राष्ट्रवादी प्रचार गीते पाटणच्या आजच्या आठवडी बाजारास आलेल्या बाजारकरू, व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक यांच्यासह नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. रोड शो व रॅलीमुळे वातावरण पूर्णपणे राष्ट्रवादीमय झाले होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |