फलटण : फलटण नगर परिषद स्विकृत सदस्यपदी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) यांची निवड झाल्याचे आज घोषीत होताच कार्यकर्त्यांनी फलटण शहरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. सचिन सुर्यवंशी (बेडके) यांच्यावर सर्व स्तवरारुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फलटण नगर परिषदेतील सदस्य संख्येच्या प्रमाणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि विरोधी राष्ट्रीय काँग्रेस 1 स्विकृत सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे स्विकृत सदस्य डॉ. प्रविण आगवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सचिन सुर्यवंशी (बेडके) यांना संधी दिल्याने त्यांनी दि. 31 रोजी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे दाखल केला, छाननी नंतर सदर अर्ज वैध असल्याचे आणि एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याच दिवशी सचिन सुर्यवंशी (बेडके) यांची निवड निश्चित झाली होती, तथापी निवडणूक प्रक्रियेनुसार पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा निताताई मिलिंद नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सचिन सुर्यवंशी (बेडके) यांची स्विकृत सदस्यपदी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरश: वर्षाव झाला.
नगराध्यक्षा निताताई नेवसे यांनी पुष्पहार घालुन सचिन सुर्यवंशी (बेडके) यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा विद्यमान नगरसेवक रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कृष्ना खोरे महामण्डलाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगम्बर आगवणे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व अन्य नगरसेवक/ नगरसेविका, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांच्यापासून फलटण तालुक्याच्या किंबहुना सातारा जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिलेल्या सुर्यवंशी (बेडके) कुटुंबाने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत राजकारणापेक्षा समाजकारणाद्वारे केलेली कामे, उभ्या केलेल्या संस्था आणि या संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या लोकहिताच्या योजना नेहमीच सर्वसामान्यांना आधार देणार्या ठरल्या आहेत.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतानाही प्रामुख्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू मुलांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे या भावनेतून स्व. नामदेवराव सुर्यवंशी (बेडके) उर्फ नाना यांनी तत्कालीन सहकार्यांना बरोबर घेवून ही शिक्षण संस्था उभी केली त्यांच्यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) आणि सचिन सुर्यवंशी (बेडके) व महेंद्र सुर्यवंशी (बेडके) हे दोघे बंधू श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा वाढता पसारा सांभाळताना स्व. नानांनी घालुन दिलेल्या प्रथा, परंपरा आणि ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची सोय पाहण्याची, त्यांची कसलीही अडचण असली तरी ती दूर करुन त्यांच्या शिक्षणात कोठेही बाधा येणार नाही यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
सचिन सुर्यवंशी (बेडके) श्रीराम एज्युकेशन सोसायटी व प्रतापसिंह शेतकरी बोर्डींग, फलटणच्या मानद सचिवपदावर आल्यापासून त्यांनी संस्थेच्या विस्ताराला प्राधान्य दिले. त्यातून फार्मसी कॉलेज, नामदेवराव सुर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, विद्यांगण इंग्लिश मिडियम स्कूल यासारखी शिक्षणाची नवी दालने उभी करतानाच फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सौ. वेणुतार्ई चव्हाण कन्या विद्यालय आणि ग्रामीण भागातील अन्य विद्यालये उत्तम प्रकारे चालविताना तेथे गुणवत्ता वाढीला आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रियतेला प्राधान्य देतानाच तेथे सर्व शैक्षणिक साधने सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षकवर्ग असला पाहिजे याला त्यांनी प्राधान्य दिले.
दरम्यान सचिन सुर्यवंशी (बेडके) यांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले. त्यानंतर माजी खासदार व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे आशिर्वाद घेतले त्याचप्रमाणे वडील सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) व आई सविता सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) या मातापित्यांचे अशिर्वाद घेतले. त्यानंतर लक्ष्मीनगर येथील निवासस्थानी शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, श्रीराम एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक/शिक्षिकांनी त्यांचे पुष्पहार घालुन अभिनंदन केले. शहरातील नागरिक त्यांच्या अभिनंदनासाठी लक्ष्मीनगर येथील निवासस्थानी दाखल झाले होते.
सुर्यवंशी (बेडके) कुटुंबाने आतापर्यंत तळागाळातील सर्वसामान्यांसाठी केलेले काम त्यातून आपल्यावर झालेल्या संस्काराचा आणि आपल्या पाठीशी असलेल्या सर्व क्षेत्रातील कामकाजाच्या अनुभवाचा फायदा घेवून या नव्या क्षेत्रात प्राप्त झालेल्या संधीचे आपण निश्चित सोने करु फलटण शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवू असा विश्वास सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकारानशी बोलताना व्यक्त केला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |