RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

दारु वाहतुकप्रकरणी दोन दुचाकी जप्त

15 April 2019 at 01:50

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर परिसरात दोन ठिकाणी दारु वाहतुकीच्या कारवाई केल्या. या कारवाईत एकूण 129 दारुच्या बाटल्या व दोन दुचाकी असा 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित तुकाराम लक्ष्मण जोशी (वय 37, रा. गोडोली) याला गोडोली येथे दुचाकीवर असताना पोलिसांनी अडवले. यावेळी त्याच्याकडे दारुच्या 48 बाटल्या होत्या. दरम्यान, लहू गोपीनाथ नाईक (वय 28, रा. खेड) याला पोलिसांनी वाढे फाटा येथे पकडला असता त्याच्याकडे 81 दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी दोन्ही वाहने, दारु जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

9 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

9 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

9 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

9 hours before