07:36pm | Sep 18, 2018 |
मुंबई : देशभरातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. एकूण ३१४५ आमदारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांनी स्थान मिळवले आहे. उद्योगपती आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचं वार्षिक उत्पन्न ३४.६६ कोटी असून त्यांनी व्यवसाय म्हणून नोकरी दाखवली आहे. ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी असून त्यांचा व्यवसाय शेती आहे. ते या यादीत शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी आहे. पनवेलचे प्रशांत ठाकूर यांचं वार्षिक उत्पन्न- ५.६१ कोटी आहे, ते या यादीत १७ व्या स्थानी आहेत.
आमदार एन. नागराजू (वार्षिक उत्पन्न १५७.०४ कोटी) हे पहिल्या क्रमांकावर आहेत. सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या टॉप २० आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वार्षिक उत्पन्न ९.०९ लाखांसह २० व्या स्थानावर आहेत.
२०१३ ते २०१७ दरम्यान निवडणुकांमध्ये देशातील ४०८६ आमदारांपैकी ३१४५ आमदारांनी वार्षिक उत्पन्न निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. ९४१ आमदारांनी अजूनही त्यांची संपत्ती घोषित केलेली नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे.
पाचवी ते १२ वीपर्यंत शिकलेल्या १०५२ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ३१.०३ लाख रुपये आहे. तर पदवीधर आणि त्या पुढील शिक्षण असलेल्या १९९७ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २०.८७ लाख रुपये आहे. आठवी पास १३९ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ८९.८८ लाख आहे. अशिक्षित आमदारांचं सरासरी वार्षिक उत्पन्न ९.३१ लाख रुपये आहे.
कर्नाटकमधील एकूण २०३ आमदारांचे वार्षिक उत्पन्न १११.४ लाख रुपये आहे तर महाराष्ट्राच्या एकूण 256 आमदारांचं वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये आहे. कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |