02:36pm | Aug 21, 2018 |
कराड : माजी मंत्री व आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय कारकिर्दिचा आढावा घेणारा ऐतिहासिक गौरव ग्रंथ 'समाजकारणातील भगीरथ' या ग्रंथाचे प्रकाशन दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता येथील शेती उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. निळकंठ रथ, साहित्यिक रामदास फुटाणे, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, रायगडचे आ. जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती ग्रंथाचे संपादक प्राचार्य गणपतराव कणसे यांनी दिली.
'समाजकारणातील भगिरथ' या ग्रंथ प्रकाशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, जि. प. सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना दुध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, पं. स. समितीचे माजी सभापती एम. जी. थोरात, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण उपस्थित होते.
गणपतराव कणसे म्हणाले, माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी स्थापन केलेल्या रयत संघटनेचा व काकांच्या राजकीय कारर्किदीचा सुवर्ण महोत्सव तसेच १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनाचा अमृत महोत्सव हा सुवर्ण योग एकाच वेळी दि. १० डिसेंबर २०१७ रोजी साजरा करण्यात आला. या समारंभाचे औचित्य साधत रयत संघटनेच्यावतीने काकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला दि. २४ ऑगस्ट रोजी मुहूर्त रूप येत आहे. येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे.
ते म्हणाले, हा ग्रंथ ४५०पानी आहे. काकांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वाटचालीत ज्यांचा प्रभाव राहिला ते स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर, स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब, काकांच्या अर्धांगिनी आशादेवी पाटील यांच्या छायाचित्रांना ग्रंथाच्या प्रारंभी स्थान देण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे यांची ग्रंथाला प्रस्तावना आहे. ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने आकाशवाणी केंद्राने घेतलेल्या प्रकट मुलाखतीचा समावेश या ग्रंथात करण्यात आला असून ती मराठी, हिंदी व इंग्रजी अशी तीन भाषेत आहे.
ते पुढे म्हणाले, ग्रंथामध्ये एकूण १३ उपविभाग आहेत. दोन उपविभागात प्रस्तावना व विलासकाकांनी सुवर्ण महोत्सवात प्रकट केलेले विचार मराठी व हिंदीमध्ये शब्दबध्द करण्यात आले आहेत. तर सोहळ्यातील पाच मान्यवरांच्या भाषणांचा यात समावेश आहे. चौथ्या विभागात राज्यसह राष्ट्रीय पक्षातील मान्यवरांचे १७ लेख यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, जलसंपदामंत्री गिरिष बापट यांच्या लेखांचे समावेश आहे. पाचव्या विभागात प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सहाव्या विभागात पाच साहित्यिकांचे लेख, सात व आठव्या विभागात शिक्षण व प्रसारमाध्यम मान्यवरांचे १५ लेख, नवव्या विभागात विविध क्षेयत्रातील मान्यवरांचे लेख तसेच दहाव्या विभागात काकांच्या कुटुंबियांचे लेख तसेच आकराव्या व बाराव्या विभागात काकांचे कार्यकर्ते व सामान्य जनांचे लेखांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती गणपतराव कणसे यांनी दिली.
राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून याकडे पहा..!
दि. २४ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिनाच्या निमित्ताने कराड तालुक्यात देशाच्या विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाऱ्या मान्यवरांचे कराड तालक्याला अनमोल मार्गदर्शन मिळवून दिले आहे. ही परंपरा भविष्यात येणाऱ्या पिढीने जोपासण्याबरोबर या विचारवंताचे विचार समाजात रूजवण्याची गरज आहे. ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने तालुक्याला संत साहित्याचे गाढे अभ्यासक, कृषी अर्थतज्ज्ञ, साहित्यिक अशा विविध महत्वपूर्ण व्यक्तीचे विचार ऐकावयास मिळणार आहेत. हे विचार समाजात रूजवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाकडे सर्वांनी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून पहावे, असे आवाहन माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी यावेळी केले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |